Jump to content

"रामायणाचा काळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वाल्मिकी रामायणातील रामकथा काल्पनिक आहे की राम एक ऐतिहासिक पुरु...
(काही फरक नाही)

१९:०९, २ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

वाल्मिकी रामायणातील रामकथा काल्पनिक आहे की राम एक ऐतिहासिक पुरुष होता याबद्दल संशोधकांत अनेक मतभेद आहेत. राम ऐतिहासिक व्यक्ती मानून तो नेमका कधी झाला यावरही पुष्कळ संशोधन करण्याचे प्रयत्‍न झाले आहेत.

रामायणकाळ इ.स.पू २००० पूर्वीचा नाही.

  • भारतात काही मंडळींना आपला इतिहास पुरातनातील पुरातन ठरवायचा आटोकाट प्रयत्‍न करण्याची हौस आहे. पुरातत्ववेत्त्यांच्या उत्तर प्रदेशातील विविध उत्खननांतून जे नागरी जीवनाचे पुरावे मिळतात ते इसपू २००० च्या पलीकडे जात नाहित. इसपू २००० ते इसपू १७५० या काळात पर्जन्यमान कमी झाल्याने सिंधू खोर्‍यातील काही लोकांनी गंगेच्या खोर्‍यात स्थलांतरे करत नागर संस्कृतीचा पाया घातला, तत्पूर्वी हा भाग ग्रामीण संस्कृतीचा होता हेही आता विविध उत्खननांतून सिद्ध झाले आहे. बी.बी. लाल यांनी केलेली उत्खनने त्यासाठी अभ्यासयोग्य आहेत. रामायणातील संस्कृती ही नागर व वन्य अशी मिश्र संस्कृती असल्याने ती इसपू २००० पूर्वीची नाही असे स्पष्ट म्हणता येते.
  • कोणताही अभ्यासक रामाचा काळ, त्याला ऐतिहासिक पुरुष मानले तरी इसपू १२०० च्या पलीकडेे नेत नाहीत.
  • भारतीय पुरातत्ववेत्ते एच.डी. सांकलिया हे रामायणकाळाला इसपू चवथ्या शतकापार नेत नाहीत.