"मुजुमदारवाड्यातील गणेशोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुणे शहरात कसबा पेठेत शनिवारवाड्याजवळ सरदार मुजुमदारांचा वाड...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
मुजुमदार वाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून गणेश उत्सवाची सुरुवात होते. प्रतिपदेला मुजुमदारवाड्यातील खालच्या देवघरात वर्षभर असलेली ‘श्री’ मूर्ती वाजतगाजत वर, गणेशमहालात आणली जाते. तेथे लाकडी नक्षीदार मयूरासनावर तिची विधिवत प्रतिष्ठापना केली जाते.लघुरुद्र, ब्रह्मणेस्पती सुक्त व अथर्वशीर्षाची सहस्रावर्तने होऊन षोडशोपचार पूजा केली जाते. पुरणाच्या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवून नंतर प्रसाद भोजन असते.

उत्सवकाळात रोज सकाळी अथर्वशीर्षांची आवर्तने म्हणण्यात येतात. रात्री, गायनाचा कार्यक्रम असे. भाद्रपद शुक्ल पंचमी हा उत्सवाच्या सांगतेचा दिवस असतो. त्या दिवशी उत्तररात्री तीर्थप्रसादाचे कीर्तन-लळीत होतेे व मखरावर पडदा टाकून मूर्ती ‘पुनरागमनयच’ म्हणत परत देवघरात स्वस्थानी जाते. प्रसाद म्हणून सर्वांना ‘श्रीफळ’ देतात. अशा प्रकारे उत्सवाची सांगता होते.

१६:१५, १७ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

पुणे शहरात कसबा पेठेत शनिवारवाड्याजवळ सरदार मुजुमदारांचा वाडा आहे. इ.स. १७७० मध्ये हा वाडा बांधला गेला. ३० ते ३५ खोल्यांच्या या वाड्यात दर्शनी कोरीव दरवाजा, छोटा दिंडी दरवाजा असून आतील बांधकामावर कोरीव काम आहे. वाड्यात हंड्या, झुंबरे असलेला गणेश महाल आहे. हा वाडा ऐतिहासिक वास्तू म्हणून जाहीर झाला आहे. या वाड्यात सरदार मुजुमदार यांचे १९९४ ते १९७३ या काळात वास्तव्य होते.

या वाड्यातील नेहमीच्या देवघरात वर्षभर खास ब्राह्मणांकरवी देवांची पूजा होते.

वाड्यातील गणपति उत्सव