Jump to content

"आबासाहेब मुजुमदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सरदार आबासाहेब (गंगाधर नारायणराव) मुजुमदार हे प्रभुणे घराण्यातू...
(काही फरक नाही)

००:४२, १७ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

सरदार आबासाहेब (गंगाधर नारायणराव) मुजुमदार हे प्रभुणे घराण्यातून मुजुमदार घराण्यात दत्तक आले. ते इतिहास संशोधक असून शास्त्रीय संगीतातील उत्तम जाणकार होते.

आबासाहेब मुजुमदार यांचा भारतातील १०८ संस्थांशी विविध पदांन्वये संबंध होताच, शिवाय भारतभराच्‍या संस्‍थानिकांशीही संबंध होता. भारत इतिहास संशोधक मंडळाच्‍या चिटणीस पदावर ते चोवीस वर्षे होते. त्‍यांचा फारसी भाषेचा व्यासंग होता. आबासाहेबांनी गायनोपयोगी अशा तीस हजार चीजांचा संग्रह केला होता. हा संग्रह त्‍यांच्‍या वारसदारांनी डिजिटल स्‍वरूपात जपून ठेवला आहे.

आबासाहेब मुजुमदारांना अनेक व्‍यक्‍तींनी वाद्ये भेट दिली होती. या वाद्यांचा त्‍यांनी संग्रह केला होता. आबासाहेब मुजुमदार यांना चित्र, शिल्प, ताम्रपट, पोथ्या इत्यादी जमविण्याचाही छंद होता.

कसबा पेठेतील त्‍यांच्‍या स्वत:च्या पेशवाई वाड्यात त्‍यांनी सुरू केलेल्‍या गणेशोत्सवात कितीतरी गायक, गायिका गाऊन गेल्या आहेत. आबासाहेब मुजुमदारांचा वाडा संस्थानांप्रमाणे कलाकारांसाठी व्यासपीठ आणि आश्रयस्थान ठरला. आबासाहेब स्‍वतः उत्तम सतारवादक होते. तंतुवाद्यावर त्‍यांची हुकूमत होती. ते केवळ पाच मिनिटांत तंबोरा लावत असत.

ब्रिटीश कालावधीत ते फर्स्‍ट क्‍लास सरदार होते. त्‍या काळात सरदार, इनामदार, जहागीरदार या सर्वांचा मतदार संघ होता. आबासाहेब त्‍याचे प्रतिनिधित्‍व करत. या मतदारसंघातून ते कायम बिनविरोध निवडून येत. त्‍या काळचे ते एमएलए एमपी होते. त्‍यांचा साधेपणाआणि निष्‍कलंक प्रतिमा ही त्‍यांची वैशिष्‍ट्ये होती. पु.ल. देशपांडे यांच्यासह अनेक लेखकांनी संगीताबद्दल केलेल्‍या लेखनात आबासाहेब मुजुमदारांचा संदर्भ दिलेला आढळतो.

आबासाहेब मुजुमदार यांचे पुणे येथे १६ सप्टेंबर १९७३ रोजी निधन झाले.