"ग.वि. केतकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १५: | ओळ १५: | ||
==गांधी हत्या आणि केतकरांचे भाषण== |
==गांधी हत्या आणि केतकरांचे भाषण== |
||
[[महात्मा गांधी]] खून खटल्यातील आरोपींपकी जन्मठेपीची शिक्षा झालेले गोपाळ गोडसे व करकरे दि. १३/१०/१९६४ ला सुटले. ते पुण्यात परतल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी आणि सहविचारी स्नेह्यांनी उद्यान कार्यालयात सत्यनारायण (की सत्यविनायक) केला. त्या वेळी(१२ नोव्हेंबर १९६४ रोजी) ग. वि. केतकरांनी भाषणात सांगितले की, 'गांधींचा खून करण्याचा कट काही व्यक्ती करीत आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष खून होण्यापूर्वीच माहीत झालेले होते व ते आपण काँग्रेसचे पुण्यातील नेते व स्वातंत्र्य-सनिक बाळूकाका कानिटकर यांना सांगितले होते. एवढेच नव्हे तर ही माहिती बाळ गंगाधर खेर (मुख्यमंत्री) यांना कळवून योग्य ती उपाययोजना करण्यास सुचवावे असेही मी त्यांना (बाळूकाका कानिटकरांना) सांगितले होते. शासकीय अधिकार्यांनी त्याबाबत काय केले हे मला (केतकरांना) कळू शकले नाही.' |
[[महात्मा गांधी]] खून खटल्यातील आरोपींपकी जन्मठेपीची शिक्षा झालेले गोपाळ गोडसे व करकरे दि. १३/१०/१९६४ ला सुटले. ते पुण्यात परतल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी आणि सहविचारी स्नेह्यांनी उद्यान कार्यालयात सत्यनारायण (की सत्यविनायक) केला. त्या वेळी(१२ नोव्हेंबर १९६४ रोजी) ग. वि. केतकरांनी भाषणात सांगितले की, 'गांधींचा खून करण्याचा कट काही व्यक्ती करीत आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष खून होण्यापूर्वीच माहीत झालेले होते व ते आपण काँग्रेसचे पुण्यातील नेते व स्वातंत्र्य-सनिक बाळूकाका कानिटकर यांना सांगितले होते. एवढेच नव्हे तर ही माहिती बाळ गंगाधर खेर (मुख्यमंत्री) यांना कळवून योग्य ती उपाययोजना करण्यास सुचवावे असेही मी त्यांना (बाळूकाका कानिटकरांना) सांगितले होते. शासकीय अधिकार्यांनी त्याबाबत काय केले हे मला (केतकरांना) कळू शकले नाही.' |
||
==[[गीता धर्ममंडळ]]== |
|||
[[पुणे|पुण्यात]] इ.स. १९२४ मध्ये स्थापन झालेल्या [[गीताधर्म मंडळ|गीताधर्म मंडळाचे]] सदाशिवशास्त्री भिडे हे संस्थापक अध्यक्ष होते. तर संस्थापक कार्यवाह ग.वि. केतकर होते. केतकर हे स्वतः गीतेचे अभ्यासक आणि उपासक होते. श्रीमद्भगवद्गीता - या एकाच विषयावर, जास्तीत जास्त वृत्तपत्रीय लेखन, त्यांनी केले. असे म्हणतात की भारतीय भाषांमध्ये, गीता या विषयांवर इतके विपुल लेखन, अन्य कोणी केले नसावे. |
|||
ग. वि. केतकर यांनी अनेक वृत्तपत्रांतून, गीताविषयक लेखन करून, गीताधर्म मंडळाच्या स्वीकृत कार्याचा उदंड प्रचार केला. तसेच त्यांनी विविध विद्यालयांतून गीता पाठांतराच्या स्पर्धा आयोजित केल्या. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीताजयंती म्हणून साजरा केला जावा, यासाठी ग.वि. केतकर यांनी प्रचंड पत्रव्यवहार केला. आता हा दिवस गीताजयंती म्हणून, भारतात सर्वत्र साजरा केला जातो. |
|||
९ डिसेंबर १९३९ या दिवशी, मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष सदाशिवशास्त्री भिडे यांचे अकाली निधन झाल्यानंतरले. त्यांच्या निधनानंतर केतकरांनी [[गीताधर्म मंडळ|गीताधर्म मंडळाचे]] काम १९५८ पर्यंत आणि त्यानंतर विनायकराव आपट्यांकडे सोपविले.. |
|||
==ग.वि. केतकरांनी लिहिलेली पुस्तके== |
==ग.वि. केतकरांनी लिहिलेली पुस्तके== |
००:०९, १६ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
गजानन विश्वनाथ केतकर (जन्म : १० ऑगस्ट, १८९८; मृत्यू : ???) हे एक सावरकरवादी, विज्ञाननिष्ठ मराठी पत्रकार होते. लोकमान्य टिळकांचे ते नातू (मुलीचे पुत्र) होते.[१]त्यांचे बालपण व पहिले तारुण्य टिळकांच्या देखरेखीखाली गेले. टिळकांच्या सल्ल्यानुसार कायद्याची परीक्षा (बी.ए. एल्एल.बी) देऊन ते "केसरी' वर्तमानपत्रात दाखल झाले.
केतकर हिंदुत्ववादी होते. त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा या दोन्ही संघटनांशी संबंध होता. व्यक्तिशः गोळवलकर गुरुजी आणि वि.दा. सावरकर यांच्याशीही त्यांचे निकटचे संबंध होते. महाराष्ट्र काँग्रेसचे चिटणीस या नात्याने केतकरांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन तुरुंगवासही सोसला होता.
महात्मा गांधी यांची गांधीहत्या झाली तेव्हा केतकर "केसरी' पत्राचे संपादक होते. हत्येनंतर सावरकर-गोडसे प्रभृतींवर खटला भरण्यात आला आणि संघावर बंदी आली. केतकरांनी या दोन्ही प्रसंगी हिंदुत्ववादी विचारांची व व्यक्तींची पाठराखण केली. संघावरील बंदी उठवण्यासाठी वल्लभभाई पटेल व गोळवलकर गुरुजी यांच्यात यशस्वी शिष्टाई केली.
ग.वि.केतकर हे काही काळ मराठा या इंग्रजी वर्तमानपत्राचेही संपादक होते.
विवाह
केतकरांनी हिंदू धर्मावर निष्ठा असणार्या दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश महिलेशी, तिला हिंदू करून घेऊन प्रेमविवाह केला, तेव्हा केसरीमधील हिंदुत्ववाद्यांनी त्यांना माफ केले नाही. अमलाबाईंशी विवाह केल्याबद्दल त्यांना ’केसरी'चे संपादकपद सोडावे लागले.
तरुण भारत हे दैनिक मुळात साप्ताहिक स्वरूपात २० जानेवारी १९२६ रोजी नागपूर येथे सुरू झाले. २० जानेवारी १९५७ पासून तरुण भारतची पुणे आवृत्ती प्रकाशित होऊ लागली. या आवृत्तीच्या संपादकपदी गजानन विश्वनाथ केतकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ही संपादकत्वाची धुरा, सुमारे सात वर्षे म्हणजे १९६४ पर्यंत आपल्या खांद्यावर वाहिली. पण गांधीहत्येच्या संदर्भात केतकरांनी केलेल्या काही विधानांमुळे त्यांच्यावर सरकारी रोष ओढवला. त्यामुळे त्यांनी ’तरुण भारत’चे संपादकपद सोडले.
गांधी हत्या आणि केतकरांचे भाषण
महात्मा गांधी खून खटल्यातील आरोपींपकी जन्मठेपीची शिक्षा झालेले गोपाळ गोडसे व करकरे दि. १३/१०/१९६४ ला सुटले. ते पुण्यात परतल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी आणि सहविचारी स्नेह्यांनी उद्यान कार्यालयात सत्यनारायण (की सत्यविनायक) केला. त्या वेळी(१२ नोव्हेंबर १९६४ रोजी) ग. वि. केतकरांनी भाषणात सांगितले की, 'गांधींचा खून करण्याचा कट काही व्यक्ती करीत आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष खून होण्यापूर्वीच माहीत झालेले होते व ते आपण काँग्रेसचे पुण्यातील नेते व स्वातंत्र्य-सनिक बाळूकाका कानिटकर यांना सांगितले होते. एवढेच नव्हे तर ही माहिती बाळ गंगाधर खेर (मुख्यमंत्री) यांना कळवून योग्य ती उपाययोजना करण्यास सुचवावे असेही मी त्यांना (बाळूकाका कानिटकरांना) सांगितले होते. शासकीय अधिकार्यांनी त्याबाबत काय केले हे मला (केतकरांना) कळू शकले नाही.'
पुण्यात इ.स. १९२४ मध्ये स्थापन झालेल्या गीताधर्म मंडळाचे सदाशिवशास्त्री भिडे हे संस्थापक अध्यक्ष होते. तर संस्थापक कार्यवाह ग.वि. केतकर होते. केतकर हे स्वतः गीतेचे अभ्यासक आणि उपासक होते. श्रीमद्भगवद्गीता - या एकाच विषयावर, जास्तीत जास्त वृत्तपत्रीय लेखन, त्यांनी केले. असे म्हणतात की भारतीय भाषांमध्ये, गीता या विषयांवर इतके विपुल लेखन, अन्य कोणी केले नसावे.
ग. वि. केतकर यांनी अनेक वृत्तपत्रांतून, गीताविषयक लेखन करून, गीताधर्म मंडळाच्या स्वीकृत कार्याचा उदंड प्रचार केला. तसेच त्यांनी विविध विद्यालयांतून गीता पाठांतराच्या स्पर्धा आयोजित केल्या. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीताजयंती म्हणून साजरा केला जावा, यासाठी ग.वि. केतकर यांनी प्रचंड पत्रव्यवहार केला. आता हा दिवस गीताजयंती म्हणून, भारतात सर्वत्र साजरा केला जातो.
९ डिसेंबर १९३९ या दिवशी, मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष सदाशिवशास्त्री भिडे यांचे अकाली निधन झाल्यानंतरले. त्यांच्या निधनानंतर केतकरांनी गीताधर्म मंडळाचे काम १९५८ पर्यंत आणि त्यानंतर विनायकराव आपट्यांकडे सोपविले..
ग.वि. केतकरांनी लिहिलेली पुस्तके
- ख्रिस्ती ड्रामा
- गीताबीज
- गीतार्थचर्चा
- मर्मभेद
- रणझुंझार डॉ. पां.स. खानखोजे यांचे चरित्र; याशिवाय अनेक छोटेखानी चरित्रे
- लोकमान्यांची भाषाशैली
- हिंदुत्वाची राष्ट्रीय मीमांसा
केतकरांची प्रकाशित चरित्रे
- ’पत्रकार-महर्षी ग.वि. केतकर’ (लेखक : अरविंद केतकर)