"डेमू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डेमू म्हणजे डीझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट. हे युनिट असलेल्या र... |
(काही फरक नाही)
|
२३:१७, १३ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
डेमू म्हणजे डीझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट. हे युनिट असलेल्या रेल्वे गाड्यांना डेमू गाडी म्हणतात.
आगगाडीच्याच एखाद्या किंवा एकाहून अधिक डब्यात हे यंत्र बसवलेले असते. ते डीझेल वापरून वीज निर्माण करते आणि त्या विजेवर ते डबे रुळावरून धावतात. असे यंत्र बसविलेल्या डब्यांबरोबर त्याला जोडलेले इतरही काही डबे धावतात. थोडक्यात एक लहानशी आगगाडीच या यंत्रांद्वारे चालते. या गाडीला इंजिनाची गरज नसते.
डेमूचे फायदे
उतारूंची संख्या वाढली की अधिक डेमू असलेले डबे जोडले की काम भागते.
ज्या रेल्वेमार्गावरील दोन स्टेशनांमधील अंंतर फार जास्त नसते, तेथे डेमू गाड्या खूप उपयोगी ठरतात.
महाराष्ट्रातील डेमू गा्ड्यांचे मार्ग
१. पनवेल-सोमाटणे-रसायनी-आपटा-जिते-हमारपूर-पेण-कासू-नागोठाणे-निदी-रोहा-कोलाड-इंदापूर-माणगांव-गोरेगाव रोड-वीर-सपे वामने-करंजादी-व्ण्हारे-दिवाण खावटी-खेड-अंजनी-चिपळूण (दिवसाला किमान ३४ गाड्या)
२. दिवा-कोपर-भिवंडी रोड-खारबाव-कामण रोड-जूचंद्र-वसई रोड
३. डोंबिवली-कोपर-भिवंडी रोड-खारबाव-कामण रोड-जूचंद्र-वसई रोड-विरार-वैतरणा-सफाळे-केळवे रोड-पालघर-उमरोली-बोइसर