Jump to content

"नी.र. वऱ्हाडपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: काव्यतीर्थ व शास्त्री असलेले डॉ. नी.र. वर्‍हाडपांडे (जन्म : १९२१; म...
(काही फरक नाही)

२३:३९, २ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

काव्यतीर्थ व शास्त्री असलेले डॉ. नी.र. वर्‍हाडपांडे (जन्म : १९२१; मृत्यू : २९ ऑगस्ट, २०१५) हे एम्.ए.; डी.लिट्. (ऑक्सफर्ड); पीएच्.डी. असून एक मराठी तत्त्वचिंतक मनोवैज्ञानिक होते. मनोविज्ञानावरील त्यांच्या मोलाच्या प्रयोगशीलतेमुळे मनोविज्ञानातील त्यांचेे दाखले बिनतोड असत. प्रसिद्ध विचारवंत बर्ट्रांड रसेल यांच्यासोबतची त्यांंची चर्चा खूप गाजली होती.

नी.र. वर्‍हाडपांडे हे नवी दिल्ली येथे डिफेन्स सायकॉलॉजिकल रिसर्च विंगमध्ये मुख्य वैज्ञानिक होते.

तर्कनिष्ठता

नी.र. वर्‍हाडपांडे यांनी देशविदेशांतील तत्त्ववेत्त्यांसोबत चर्चा करताना स्वतःतील तर्कनिष्ठता कधीही ढळू दिली नाही, यात त्यांचे खरे मोठेपण होते. वैचारिक भूमिकांमधील तर्कनिष्ठ ठामपणा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची लिखित भूमिका तावून-सुलाखून घेतलेली असे. बुद्धिवाद्यांंमध्ये आढळणारी प्रतिवादाची क्षमता तर त्यांच्यात होतीच, पण त्याविरोधात उमटणार्‍या प्रवाहांचा साक्षेपी आढावा घेण्यास ते सदैव तत्पर असत. या संयमातूनच आपली टीका अधिक धारदार करण्याचे कसब वर्‍हाडपांडे यांनी आत्मसात केले होते. युरोपातील काही विद्यापीठांमधून त्यांनी केलेली चर्चा वादळी ठरली.

भाषाप्रावीण्य

वर्‍हाडपांडे यांना मराठी-इंग्रजीे-संस्कृत व्यतिरिक्त थाई भाषा येत होती. थाई भाषेवरील झालेल्या विविध प्रभावांविषयीचे त्यांनीे अध्ययन केले होते.