"दंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ २०: | ओळ २०: | ||
;त्रयोदण्डिप्रबंधाश्च त्रिषुलोकेषु विश्रुताः ।। |
;त्रयोदण्डिप्रबंधाश्च त्रिषुलोकेषु विश्रुताः ।। |
||
; |
|||
==दंडिनः पदलालित्यम्== |
|||
खालील श्लोकात संस्कृत महाकवींपैकी चार कवींची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. कालिदासाची उपमा, भारवी कवीची अर्थपूर्ण शब्दरचना, दंडी कवीचे पदलालित्य आणि माघ कवीमध्ये हे तीनही गुण आहेत.. |
|||
;उपमा कालिदासस्य । भारवेः अर्थगौरवम् । |
|||
;दंडिनः पदलालित्यम् । माघे सन्ति त्रयो गुणाः ॥ |
|||
; |
; |
१४:१३, २३ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
दंडी हा संस्कृतमधील एक महान लेखक आणि कवी समजला जातो.
'अवंतीसुंदरी' कथा व 'अवंतीसुंदरीकथासार' या ग्रंथांवरून त्याच्या चरित्राची काही माहिती मिळते. त्याच्या प्रपितामहाचे नाव दामोदर, पितामहाचे नाव मनोरथ, पित्याचे नाव वीरदत्त तर, आईचे नाव गौरी असे होते. तो कांची येथील पल्लवांच्या राजसभेतील कवी होता. महाकवी भारवी दक्षिण भारतातील कांचीपूर नगरीतील सिंहविष्णू नावाच्या पल्लव राजाच्या राजसभेत होता. भारवीला तीन मुलगे झाले त्यातील मनोरथ नावाच्या मुलाला वीरदत्त नावाचा पुत्र झाला. वीरदत्ताची पत्नी गौरी. वीरदत्त आणि गौरी यांच्या पोटी प्रसिद्ध कवी दंडी याचा जन्म झाला. यावरून कवी दंडी हा महाकवी भारवीचा पणतू आहे, हे लक्षात येते. तीच भारवीच्या काव्याची परंपरा दंडीला लाभली. अभ्यासकांच्या मते तो इ. स. ६०० च्या सुमारास होऊन गेलेला असावा.
दंडीच्या नावावर जरी किमान तीन ग्रंथ असले, तरी त्यापैकी काव्यदर्श व दशकुमारचरित हे दोनच ग्रंथ उपलब्ध आहेत. काव्यादर्श हा ग्रंथ काव्यचर्चेच्या काळातील स्वतंत्र ग्रंथ आहे. त्यामुळे तो संस्कृत साहित्यशास्त्राच्या परंपरेत मान्यता पावलेला ग्रंथ आहे. विद्वानांनीही या ग्रंथाचा खूप आदर केला आहे. महाकाव्याचे चिंतन आणि समीक्षण करणारा हा ग्रंथ प्रमाणभूत म्हणून मानण्यात येतो. या ग्रंथाची श्लोकसंख्या ३६० असून, त्याचे तीन परिच्छेद आहेत. पहिल्या परिच्छेदात महाकाव्याची व्याख्या केली आहे; तसेच महाकाव्याचे तीन विभागही सांगितले आहेत.
काव्यदर्श ग्रंथात दंडीची सूक्ष्म बुद्धी, कल्पकता आणि तर्कशुद्ध विचारपद्धती दृष्टीस पडते. त्यावरूनच दंडी हा संस्कृत कवी आणि काव्यशास्त्रज्ञ म्हणून गौरविला गेला आहे. दंडीने लिहिलेले गद्य ग्रंथही वैदर्भी शैलीत असून, त्यांतील पदलालित्य रसिकांना मुग्ध करणारे आहे. म्हणूनच - दण्डिन: पदलालित्यम् असा त्याच्या शैलीचा गौरव संस्कृत रसिकांनी केला आहे.
दंडीच्या मते गद्य, पद्य आणि मिश्र असे काव्याचे तीन विभाग आहेत, तर आख्यायिका आणि कथा असे महाकाव्याचे दोन प्रकार आहेत. महाकाव्याबरोबरच दंडीचे वाङ्मय प्रकाराचेही भेद वर्णिले आहेत. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मिश्र असे वाङ्मयाचे चार भाग त्यांनी सांगितले आहेत, तर वैदर्भी आणि गौडी भाषाशैलीचे प्रकार आणि काव्याचे दहा गुण वर्णिले आहेत. विदग्ध महाकाव्याची लक्षणे मांडणारे जे महत्त्वाचे ग्रंथ शास्त्रकारांनी मान्य केले आहेत त्यात अग्निपुरण, काव्यालंकार, सरस्वतीकंठाभरण, साहित्यदर्पण आणि दंडीच्या काव्यादर्श या ग्रंथाचा आवर्जून उल्लेख केला आहे. कवित्वशक्ती कशामुळे प्राप्त होते याचे विवेचन करताना दंडीने म्हटले आहे, की प्रतिभा, श्रुत आणि अभियोग या तीन गुणांमुळे कवित्वशक्ती उभी राहते.
दशकुमारचरितात दहा कुमारांच्या साहसी जीवनाची अद्भुत कथा गुंफली आहे.
'त्रयो दण्डिप्रबन्धाश्च' यासारख्या वचनांमधून दंडीने तीन ग्रंथ लिहिले आहेत, असे सांगितले जाते. परंतु काव्यदर्श आणि दशकुमारचरित याशिवाय वरील संदर्भानुसार नेमका तिसरा कोणता ग्रंथ दंडीचा हे सांगता येणे अवघड आहे. त्याने आपल्या ग्रंथांत महाराष्ट्रीय प्राकृताची स्तुती केली आहे. वैदर्भी रीतीला श्रेष्ठ मानले आहे. आपल्या काव्यात त्याने आंध्र, चोळ, कलिंग व विदर्भ या दक्षिणेतील देशांचे विपुल वर्णन केले आहे. त्याच्या काव्यात कावेरी नदीचा व दक्षिणी चालीरीतीचा वारंवार उल्लेख येतो. यावरून विद्वानांनी असा निष्कर्ष काढला आहे, की दंडी हा दाक्षिणात्य कवी होता.
त्रयो दण्डिप्रबन्धाश्च
‘शार्ङ्गधरपद्धति’ या राजशेखर लिहित ग्रंथातील एका श्लोकात म्हटले आहे की ’अग्नी, वेद, देव आणि गुण हे जसे तीनच आहेत, तसे आचार्य दंडी कवीचे तीनच प्रबंध (ग्रंथ) त्रैलोक्यात प्रसिद्ध आहेत.
- त्रयोऽग्नयस्त्रयो वेदाः त्रयो देवास्त्रयो गुणाः।
- त्रयोदण्डिप्रबंधाश्च त्रिषुलोकेषु विश्रुताः ।।
दंडिनः पदलालित्यम्
खालील श्लोकात संस्कृत महाकवींपैकी चार कवींची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. कालिदासाची उपमा, भारवी कवीची अर्थपूर्ण शब्दरचना, दंडी कवीचे पदलालित्य आणि माघ कवीमध्ये हे तीनही गुण आहेत..
- उपमा कालिदासस्य । भारवेः अर्थगौरवम् ।
- दंडिनः पदलालित्यम् । माघे सन्ति त्रयो गुणाः ॥