"भारतीय राजकारणातील स्त्रिया (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: भारतीय राजकारणातील स्त्रिया’ हे मोहिनी कडू यांनी लिहिलेले आणि... |
(काही फरक नाही)
|
१५:०६, २२ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
भारतीय राजकारणातील स्त्रिया’ हे मोहिनी कडू यांनी लिहिलेले आणि नागपूरच्या विजय प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले एक मराठी पुस्तक आहे.
भारतात अगदी आर्यांच्या काळापासून स्त्रियांना समाजात महत्त्वाचे स्थान आहे. ऋग्वेदात महिलांना राजकारणात स्थान असल्याचेही दर्शविले आहे. उपनिषद काळात व पुराणकाळात ते कायम होते. भारतावरच्या परकीय आक्रमणकाळात आणि नंतरही काही स्त्रिया राजकारणात होत्या.. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्रोत्तर काळात भारतीय स्त्रियांनी अनेक क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
या स्त्रियांपैकी राजकारणातील स्त्रियांची चरित्रे व आत्मचरित्रे यांचा अभ्यास करून त्यांच्या कार्याचे मूल्यमापन डॉ. मोहिनी कडू यांनी 'भारतीय राजकारणातील स्त्रिया 'मधून केले आहे. त्यासाठी त्यांनी प्राचीन, मध्ययुगीन काळ, ब्रिटिश काळ, स्वातंत्र्यसमराचा काळ व स्वातंत्रोत्तर काळ या सर्व कालखंडांतील स्त्रियांच्या कार्याची दखल घेतली आहे.
या पुस्तकातून रझिया सुलतान, राणी पद्मिनी, चांदबीबी, राणी दुर्गावती, झाशीची राणी, बेगम हसरतमहल अशा अनेक राण्यांचे दाखले दिले आहे. स्वातंत्र्यसंग्रामात देशकार्य करणार्या अनेक रणरागिणींची ओळख यातून होते.
विविध क्षेत्रांत कार्य करणार्या महिलांची चरित्रे, आत्मचरित्रे, स्वातंत्रोत्तर कालखंडातील स्त्रीचरित्रे, राजकारणातील महिलांची आत्मचरित्रे, अनुवादित चरित्रे - आत्मचरित्रांचा आढावाही पुस्तकात घेतला आहे.
त्यातून अनेक अज्ञात महिलांचे कार्य उजेडात आले आहे. आपल्या कर्तृत्वाने भारतच नव्हे; तर संपूर्ण जगावर प्रभाव पाडणार्या इंदिरा गांधी यांच्यावरील अकरा चरित्रांचे मूल्यमापन आहे.