"चांदमल परमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो ज ने लेख चांदमल पवार वरुन चांदमल परमार ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १९: | ओळ १९: | ||
==परमार यांचे संस्थाकीय कार्य== |
==परमार यांचे संस्थाकीय कार्य== |
||
वाहतूक क्षेत्रातील कार्याबरोबरच सिंबायोसिस, विजय वल्लभ स्कूल, पुणे पोलिस फाउंडेशन, पुणे टिंबर मर्चंट्स अॅन्ड सॉ मिल्स ओनर्स असोसिएशन, सादडी राणकपूर जैन संघ आदी संस्थांवर त्यांनी काम केले. |
* वाहतूक क्षेत्रातील कार्याबरोबरच सिंबायोसिस, विजय वल्लभ स्कूल, पुणे पोलिस फाउंडेशन, पुणे टिंबर मर्चंट्स अॅन्ड सॉ मिल्स ओनर्स असोसिएशन, सादडी राणकपूर जैन संघ आदी संस्थांवर त्यांनी काम केले. |
||
* त्यांच्या मूळ राज्यात म्हणजे राजस्थानात, साद्री खेड्यात चांदमल परमार यांनी राजश्रीच्या स्मरणार्थ ’शेठ मोतीलाल हिराचंद परमार शाळा’ सुरू केली.. |
|||
* पुण्यातील सिम्बायोसिसचे प्रमुख शां.ब. मुजुमदार व उद्योगपती अरुण फिरोदिया यांच्या मदतीने त्यांनी पुणे पोलीस पब्लिक स्कूल शिवाजीनगर येथे सुरू करण्यात मोठा वाटा उचलला. |
|||
==सरकारी आणि अन्य सन्मान== |
==सरकारी आणि अन्य सन्मान== |
२२:१७, २० ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
चांदमल मोतीलाल परमार (जन्म : इ.स. १९४२; मृत्यू : पुणे, ११ ऑगस्ट, २०१५) हे पुण्यात राहणारे एक रस्ता सुरक्षा कार्यकर्ते होते.
पुण्यातल्या घोरपडे पेठेत राहणारे चांदमल परमार हे ममता ग्रुप या व्यावसायिक संस्थेचे संचालक होते. व्यवसाय करताना, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रातही त्यांचे काम सुरू होते.
राजश्रीचा अपघाती मृत्यू आणि फाउंडेशनची स्थापना
परमार यांची मुलगी राजश्री हिचा १७ नोव्हेंबर १९८९ मध्ये पुण्यातील कॅम्पमध्ये आपल्या दुचाकीवरून जात असताना अपघाती मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी राजश्रीच्या डोक्यावर हेल्मेट नव्हते. राजश्रीचा लवकरच साखरपुडा होणार होता.
राजश्रीच्या निधनापूर्वीपर्यंत चांदमल परमार यांना ’रस्ता सुरक्षा’ या विषयाचा गंधही नव्हता. मात्र राजश्री गेल्यानंतर त्यांनी रस्ता सुरक्षेवर काम करण्याचे ठरवले. राजश्रीच्या लग्नासाठी ठेवलेला सर्व पैसा वापरून त्यांनी १ जून १९९० रोजी ’कु. राजश्री परमार मेमोरिअल फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. चांदमल यांनी १९९४पर्यंत रस्ता सुरक्षेविषयी अभ्यास केला आणि मग त्या क्षेत्रात काम सुरू केले. परमार यांचे टिंबर मार्केटमध्ये दुकान होते. पण ते सोडून त्यांनी रस्ता सुरक्षेवरच भर दिला.
रस्त्यावरील वाहतूक सुधारणेचे प्रयत्न
राजश्री परमार फाउंडेशनच्या द्वारे चांदमल परमार यांनी रस्त्यांचा अभ्यास करून नवीन कायदे तयार करणे किवा कायद्यात बदल करणे यांसाठी प्रयत्न केले.
शास्त्रीय पद्धतीने गतिरोधकाच्या उभारणीसाठी व रात्री होणारे अपघात होऊ नयेत म्हणून रस्त्यावर आणि वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यासाठी परमारांनी पाठपुरावा केला. राजश्री फाउंडेशनच्या माध्यमातून यांनी वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणे, चालकाला हेल्मेट वापरायला उद्युक्त करणे, वाहतूक नियमांचे पालन करणार्या व्यक्तींचा व या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांचा गौरव, वगैरे गोष्टी कल्या. विविध वर्तमानपत्रेर, मासिके आदींमधून चांदमल परमार यांंचे वाहतूक विषयीचे लिखाण प्रसिद्ध होत असे.
शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला, सूचना केल्या, शहराभोवती रिंग रोड उभारणी, मेट्रो, मोनो अशा प्रकल्पांवरही त्यांनी सकारात्मक मते, सूचना मांडल्या होत्या.
राज्य व केंद्र सरकारची स्वीकृती
शहरातील आणि महामार्गावरील वाहतूक सुधारणेसाठी परमार यांनी केलेल्या सूचनांचा वाहतूक पोलिसांनी, महामार्ग पोलिसांनी व राज्य सरकारने स्वीकार केला.
परमार यांचे संस्थाकीय कार्य
- वाहतूक क्षेत्रातील कार्याबरोबरच सिंबायोसिस, विजय वल्लभ स्कूल, पुणे पोलिस फाउंडेशन, पुणे टिंबर मर्चंट्स अॅन्ड सॉ मिल्स ओनर्स असोसिएशन, सादडी राणकपूर जैन संघ आदी संस्थांवर त्यांनी काम केले.
- त्यांच्या मूळ राज्यात म्हणजे राजस्थानात, साद्री खेड्यात चांदमल परमार यांनी राजश्रीच्या स्मरणार्थ ’शेठ मोतीलाल हिराचंद परमार शाळा’ सुरू केली..
- पुण्यातील सिम्बायोसिसचे प्रमुख शां.ब. मुजुमदार व उद्योगपती अरुण फिरोदिया यांच्या मदतीने त्यांनी पुणे पोलीस पब्लिक स्कूल शिवाजीनगर येथे सुरू करण्यात मोठा वाटा उचलला.
सरकारी आणि अन्य सन्मान
- चांदमल मोतीलाल परमार हे केंद्र आणि राज्य सरकारच्या रस्ता सुरक्षा समितीचे सदस्यत्व.
- काही काळासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्षपद
- इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चर या संस्थेच्या वाहतूक समितीचे अध्यक्षपद
- सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट ’सीआयआरटी, भोसरी (पुणे)‘चे सदस्यत्व
- केंद्र सरकारचा भारतीय सुरक्षा पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक पुरस्कार