"प्र.ल. मयेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: प्र.ल. मयेकर (मृत्यू : मुंबई-दादर, १८ ऑगस्ट, २०१५) हे एक मराठी नाटकका... |
(काही फरक नाही)
|
१८:५१, १८ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
प्र.ल. मयेकर (मृत्यू : मुंबई-दादर, १८ ऑगस्ट, २०१५) हे एक मराठी नाटककार होते. मालवणी बोलीतली त्यांची नाटके विशेष गाजली.
मयेकर हे मुंबईत बी.ई.एस.टी कंपनीत नोकरीला होते तेव्हापासून त्यांचा नाट्यलेखनाचा प्रवास ते निवृत्तीनंतर रत्नागिरीला स्थायिक झाल्यानंतरही चालूच राहिला होता.
मयेकरांनी १९७० च्या सुमारास हौशी रंगूमीसाठी एकांकिका आणि नाटके लिहायला सुरुवात केली. दहा वर्षांनी त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवरही सादर होऊ लागली.
प्र. ल. मयेकर यांची 'मा अस साबरीन', 'अथ मनुस जगन हं', 'आद्यंत इतिहास' असल्या फँटसीच्या अंगाने जाणारी, काल्पनिक प्रदेशातील रुपकात्मक नाटके राज्य नाट्य स्पर्धांमध्ये गाजली. या नाटकांच्या रचना आणि त्यातील भाषेचा डौल हा खास 'मयेकरी' होता.
वसंत कानेटकर यांची नाटके करणार्या 'चंदलेखा' या मोहन वाघ यांच्या संस्थेने या नाटककारास अचूक हेरले, आणि त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आणायला सुरुवात केली. पुढे त्यांची मालवणी बोलीतील नाटके मच्छिंद कांबळी यांच्या 'भद्रकाली' संस्थेने रंगभूमीवर आणली.
कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके मयेकरांनी लिहिली. १९८०नंतर व्यावसायिक रंगभूमीला मरगळ आली होती. मुंबईतील गिरणी संप आणि समाजातील अस्थिर वातावरण यामुळे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येईनासे झाले होते. अशा काळात मयेकरांनी दिलेल्या नाटकांमुळे व्यावसायिक रंगभूमी आपला तोल सावरू शकली.
प्र.ल. मयेकर यांनी लिहिलेली नाटके
- अथ मनुस जगन हं (प्रायोगिक)
- आद्यंत इतिहास (प्रायोगिक)
- आसू आणि हसू
- मा अस साबरीन (प्रायोगिक)
- दीपस्तंभ
- गोडीगुलाबी
- पांडगो इलो रे बा इलो
- रमले मी
- रातराणी
पुरस्कार==
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद ेचा राम गणेश गडकरी पुरस्कार (२०११)