Jump to content

"दीपक डुबल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. दीपक प्रकाश डुबल (जन्म : किल्ले मच्छिंद्रगड-वाळवा तालुका-सांग...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
त्यानंतर दीपक डुबल यांनी [[कोल्हापूर]] विद्यापीठातून ८८ टक्के मार्क घेऊन बी.एस्‌‍सी.केले आणि मग एम.एस्‌‍सी. एम.एस्‌सीला डिस्टिंंक्शन घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. सी.डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी.साठीचे संशोधन सुरू केले. आणि अवघ्या अडीच वर्षात 'एनर्जी स्टोरेज डिव्हायसेस' या विषयात पीएच.डी. पूर्ण केली.

==पीएच.डी.नंतर==
२०११ मध्ये पीएच.डी. मिळाल्यावर डॉ. दीपक यांनी दक्षिण कोरियातील ग्वांगजू इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी येथे दोन वर्षे संशोधक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची निवड जर्मनीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा 'अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ट' फेलोशिपसाठी झाली. त्याअंतर्गत त्यांनी जर्मनीतील केम्निट्झ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथे दोन वर्षे संशोधन केले. पुढे जगातील आणखी एका प्रतिष्ठेच्या 'मेरी क्युरी' फेलोशिपसाठी त्यांची निवड होऊन दीपक डुबल हे स्पेन येथील संस्थेत संशोधन करण्यासाठी गेले.

(अपूर्ण)
(अपूर्ण)

२२:५१, १५ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

डॉ. दीपक प्रकाश डुबल (जन्म : किल्ले मच्छिंद्रगड-वाळवा तालुका-सांगली जिल्हा, इ.स. १९८६) हे स्पेन देशातील बार्सिलोना येथील कॅटलन इन्स्टिट्यूट ऑफ नॅनोसायन्स अॅन्ड नॅनोटेक्नॉलॉजी या संस्थेत संशोधन करणारे एक मराठी वैज्ञानिक आहेत.

बालपण आणि शिक्षण

अल्पशिक्षित शेतकरी आईवडील आणि बेताची आर्थिक परिस्थिती असलेले दीपक सातवीत असताना त्यांचे वडील वारले. अशा परिस्थितीत दीपक यांच्या आईने दुसर्‍यांच्या शेतात मोलमजुरी करून दीपक आणि त्यांच्या बहिणीला वाढवले. दिवसाला ४० रूपये मजुरीवर तिनेे मुलांचे शिक्षण सुरू ठेवले.

नववीपर्यंत जेमतेम ५५ ते ५७ टक्क्यांपर्यंत मार्क मिळवणार्‍या दीपकला दहावीला आयुष्यात पहिल्यांदा पहिला वर्ग मिळाला. हा आलेख पुढे वाढत गेला आणि १२ वी सायन्सला ८२ टक्के मार्क मिळाले.

त्यानंतर दीपक डुबल यांनी कोल्हापूर विद्यापीठातून ८८ टक्के मार्क घेऊन बी.एस्‌‍सी.केले आणि मग एम.एस्‌‍सी. एम.एस्‌सीला डिस्टिंंक्शन घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. सी.डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी.साठीचे संशोधन सुरू केले. आणि अवघ्या अडीच वर्षात 'एनर्जी स्टोरेज डिव्हायसेस' या विषयात पीएच.डी. पूर्ण केली.

पीएच.डी.नंतर