Jump to content

"मुल्ला उमर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मुल्ला उमर (जन्म : चाह-इ-हिम्मत (कंदाहार प्रांत-अफगाणिस्तान), इ.स. १९...
(काही फरक नाही)

१४:५०, १ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

मुल्ला उमर (जन्म : चाह-इ-हिम्मत (कंदाहार प्रांत-अफगाणिस्तान), इ.स. १९६०; मृत्यू : इ.स. २०१३) हा अफगाणिस्तानातील तालिबान या दहशतवादी संघटनेचा सर्वोच्च नेता आणि आध्यात्मिक गुरू होता.

सोव्हिएट रशियाच्या विरोधात मुल्ला उमर लढला. त्यानंतर सोव्हिएट फौजांनी अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला. या लढाईत मुल्ला उमरच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. या लढाईनंतर मुल्ला उमरने अल कायदाच्या ओसामा बिन लादेनशी हातमिळवणी केली.अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये युद्ध मोहीम उघडली, तेव्हा मुल्ला उमर भूमिगत झाला. त्याच्यावर अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस लावले होते.

तालिबानने मुल्ला उमरचे चरित्र प्रसिद्ध केले आहे, त्यानुसार मुल्ला उमरला स्वतःचे घर नव्हते, तसेच त्याचे परदेशात बँक खातेही नव्हते. त्याची विनोदबुद्धी फार चांगली होती, असे त्या चरित्रात म्हटले आहे. तालिबानमधीलच ’अफगाणिस्तान इस्लामिक मुव्हमेन्ट फिदाई महाज’ या बंडखोर गटातील नेते मुल्ला अख्तर मोहम्मद मन्सूर व गुल आगा यांनी उमरला २०१३ सालच्या जुलै महिन्यात ठार केल्याची माहिती गटाचे प्रवक्ते काही हमजा यांनी दिली आहे.