Jump to content

"राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुणे शहरात लॉ कॉलेज रोडवर एकेकाळी प्रभात स्टुडिओ होता. नंतर त...
(काही फरक नाही)

१२:१२, २७ जुलै २०१५ ची आवृत्ती

पुणे शहरात लॉ कॉलेज रोडवर एकेकाळी प्रभात स्टुडिओ होता. नंतर त्या जागी फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था सुरू झाली. त्या संस्थेच्या प्रांगणात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आहे.

या चित्रपट संग्रहालयात नव्या जुन्या चित्रपटांच्या फिल्म, चित्रफिती, पोस्टर्स व चित्रपट माध्यमाशी संबंधित बर्‍याच गोष्टींचा संग्रह केला गेला आहे. संस्थेच्या आवारात एक ३३०प्रेक्षक क्षमतेचे व ४० जण बसू शकतील असे एक, अशी दोन चित्रपटगृहे आहेत. याशिवाय या संस्थेचे पुण्यातच कोथरूडला २०० क्षमतेचे एक सिनेमाघर आहे.

या चित्रपटगृहांमध्ये नवीन आरामशीर खुर्च्या, जमिनीवर मऊ गालिचेआणि आवाजाच्या चांगल्या अनुभवासाठी आधुनिक डॉल्बी ७.१’ त्तंत्रज्ञान, व जुन्या चित्रपटांसाठी ’मोनो साउंड ट्रॅक’ पद्धतही आहे. चित्रपटगृहांत ३५ एमएम, १६ एमएम व ८ एमएम फिल्म दाखवण्यासाठी डिजिटल लाईट प्रोसेसिंग (DLP) प्रोजेक्टर आहेत.. डिजिटल सिनेमा प्रोजेक्टर(डीसीपी)चीही सोय होत आहे.