"छारी धांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: छारी धांड हे गुजरातमशील एक पक्षी-आश्रयवन आहे. कच्छमधील भुज शहरा... |
(काही फरक नाही)
|
२३:०२, २४ जुलै २०१५ ची आवृत्ती
छारी धांड हे गुजरातमशील एक पक्षी-आश्रयवन आहे. कच्छमधील भुज शहरापासून ते ८० किलोमीटर अंतरावर आहे.
छारी धांड भुजजवळच्या नखत्राणा तालुक्यात येते. हा सगळा भाग 'बन्नी ग्रास लँड' म्हणून कच्छच्या नकाशावर दिसतो. त्यात छारी धांडने २२७ चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र व्यापले आहे.
छारी धांडच्या माळरानावर दूरपर्यंत पक्षीच पक्षी दिसतात. त्यांत शेकडोंच्या संख्येत क्रौंच पक्षी असतात. तिथल्याच एका पाणथळ जागेत सारस पक्ष्यांबरोबर फ्लेमिंगोही विहरत असतात. मोठय़ा चोचींचे पेलिकन्स पाण्यात उभे असतात. त्याच पाण्यात आंघोळ करणारे रानटी उंटही पहावयास मिळतात.
छारी धांड येथे ’छारी धांड इको टुरिझम सेंटर’ने चालविलेले एक विश्रामगृह आहे. पक्षी बघण्यासाठी बांधलेले निरीक्षण मनोरेही आहेत.