"सारडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २०: | ओळ २०: | ||
सारडे येथील अनेकजण लोक नोकरीच्या निमित्ताने बव्हंशी मुंबई, नवी मुंबई, उरण, पनवेल, पेण येथे राहतात क्वचित काही कुटुंबे अमेरिकेत स्थलांतरित झाली आहेत, तर काही नोकरीच्या निमित्ताने दुबई, दक्षिण ऑफ्रिकेत टांझानिया येथे जाऊन आली आहेत. परंतु त्यांचे गावाशी असलेले ऋणानुबंध अजूनही कायम आहेत. गावाबाहेर राहणार्या व्यक्ति गोपाळकालासाठी आणि गणपतीसाठी दरवर्षी गावाला भेट देतात. |
सारडे येथील अनेकजण लोक नोकरीच्या निमित्ताने बव्हंशी मुंबई, नवी मुंबई, उरण, पनवेल, पेण येथे राहतात क्वचित काही कुटुंबे अमेरिकेत स्थलांतरित झाली आहेत, तर काही नोकरीच्या निमित्ताने दुबई, दक्षिण ऑफ्रिकेत टांझानिया येथे जाऊन आली आहेत. परंतु त्यांचे गावाशी असलेले ऋणानुबंध अजूनही कायम आहेत. गावाबाहेर राहणार्या व्यक्ति गोपाळकालासाठी आणि गणपतीसाठी दरवर्षी गावाला भेट देतात. |
||
असे असल तरी गावात एकही दवाखाना, मेडिकल स्टोअर्स किंवा हॉस्पिटल नाही आहे.आरोग्यविषयक बाबींसाठी संपूर्ण गावाला इतरत्र जावे लागत आहे, हे भयानक वास्तव आहे. येथे शेतकर्यांसाठीचा खाडी पार करणारा पूल कोसळला आहे, त्यामुळे पलीकडे जायचे असेल तर खाडीतून जावे लागते किंवा वाहतुकीच्या पुलावरुन पलीकडे जावे लागते. गावातील बहुतेक तरुण मंडळी गोडाऊनमध्ये काम करतात, तर काही न्हाहा-शेवा बंदरात. |
|||
अवजड जड माल वहातुकदारांच्या बेजबाबदारपणे वाहने चालविल्यामुळे गावात अनेक अपघात होतात. |
|||
पाणी व्यवस्था :- बहुंताशी पाणीपुरवठा पुनाडे धरणातून होतो, परंतु जेव्हा तो खंडित होतो तेंव्हा गावातील सार्वजनिक विहिरी आणि घोलातील असलेल्या डोर्यांवर अवलंबून रहावे लागते. तेथे पाण्याचा उपसा झाला तर बाभळीवर, तेथे नसेल तर थेट चोंडी गावाला जावे लागते. |
|||
विजेची सोय :- गावात नेहमीच भार नियमन चालू असते. अनेकदा, विशेषत:पावसाळ्यामध्ये गावातील लोकांना अंधारात रहावे लागते. दरवर्षी येथे बिघाड होतोच. |
|||
. |
. |
||
१५:०५, ३ जुलै २०१५ ची आवृत्ती
सारडे हे रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील गाव आहे. तालुक्याच्या पूर्व विभागात वसलेल्या या गावात मुख्यत्वे आगरी समाजाची वस्ती आहे. येथून जवळच असलेले भंगारपाडा हा याच ग्रामपंचायतीचा एक भाग आहे.
गाव टेकडीवर वसलेले असून एकमेकांपासुन जवळ घरे बांधली आहेत. वरती राधाकृष्णाचे मंदिर आहे जेथे मंदिराबरोबर सभामंडप आहे श्रीकृष्ण आणि राधेची मोहक मृर्ती आहे त्याच बरोबर हिंदु धर्मात पवित्र मानलेल्या व संपूर्ण गावचे श्रद्धास्थान असलेल्या गाईची देखील मृर्ती आहे. .
भंगारपाड्यात 'कराडी' समाजाची वस्ती आहे. गावाच्या दक्षिणेस 'श्री बहिरी देवाचे मंदिर' आहे त्या भागाला 'उघड' म्हणतात.
गावाच्या पूर्वेस आणि पश्चिमेस डोंगर रांगा आहेत. पूर्वेच्या डोंगर रांगा दक्षिणेला 'कडापे' ह्या आवरे गावातील एका भागापर्यंत पसरलेल्या आहेत. या दोन्ही पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे 'तांदळांची शेती' मोठ्या प्रमाणात करतात.
तसेच भंगारपाड्यापाून वाहणारी खाडी उघडीवरून पुढे जाऊन पातळगंगा नदीच्या खाडीस जाऊन मिळते.
येथील पूर्वेकडील डोंगरात जेथून पाण्याचे झरे आणि ओढे वाहतात त्या भागाला 'घोल' म्हणतात .जेथे पावसाळ्यात पंचक्रो्शीतले पर्यटक आंघोळ करण्यास येतात. येथे पवित्र देवता किंवा देवकन्या वास करतात असे मानले जाते. त्या देवकन्यांना गावातील लोक 'बाया' म्हणतात .
घोलाच्या पूर्वेला' कोमनादेवी डोंगरावर' 'कोमनादेवी' प्रगट झाली आहे ते तेथे पाषाणरूपात निवास करते. गावाच्या आख्यायिकेनुसार देवी पिरकोन गावातील एका भक्ताच्या स्वप्नात आली होती तिने स्वप्नांत दृष्टान्त देऊन सांगितले की मला मुक्त राहु दे .त्यामुळे तेथे अजून मंदिर बांधले गेले नाही, परंतु सारडे पिरकोन गावातील भक्तांसाठी तिचे महत्त्व अपरंपार आहे. येथे येणारे पर्यटक देवीचे दर्शन जरूर घेतात. ही देवता येथे प्रचंड प्रिय असून तिच्या रिक्षा चालक भक्तांनी स्वतःच्या वाहनांवर कोमनादेवी प्रसन्न हे तिच्या कृपेचे प्रतीक म्हणून लिहिले आहे.
'स्वप्निल पाटील आणि सुशांत माळी यांनी 'नटखट कान्हा' ह्या गावातील ग्रुप तर्फे ’सारडे गावची श्री कोमनादेवी, श्री राधाकृष्ण आणि श्री हनुमान यांना समर्पित केलेली एक ध्वनिमुद्रिका’ बनविली आहे.
"सारडे विकास मंच" नावाची संघटना 'श्री नागेंद्र म्हात्रे' यांच्या नेतृत्वाखाली गावातील विविध सामाजिक कार्ये करीत आहे ,विषेशत: गावाती लहान मुलांपासून ते तरुण, वृद्ध व्यक्तींनी ’सारडे विकास मंच’च्या स्वच्छता मोहिमेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
सण :- गोपाळकाला हा सारडे गावातील प्रमुख सण आहे. गावात होळी, दसरा, दिवाळी ,आषाढी एकादशी हे सणसुद्धा साजरे होतात.
सारडे येथील अनेकजण लोक नोकरीच्या निमित्ताने बव्हंशी मुंबई, नवी मुंबई, उरण, पनवेल, पेण येथे राहतात क्वचित काही कुटुंबे अमेरिकेत स्थलांतरित झाली आहेत, तर काही नोकरीच्या निमित्ताने दुबई, दक्षिण ऑफ्रिकेत टांझानिया येथे जाऊन आली आहेत. परंतु त्यांचे गावाशी असलेले ऋणानुबंध अजूनही कायम आहेत. गावाबाहेर राहणार्या व्यक्ति गोपाळकालासाठी आणि गणपतीसाठी दरवर्षी गावाला भेट देतात.
असे असल तरी गावात एकही दवाखाना, मेडिकल स्टोअर्स किंवा हॉस्पिटल नाही आहे.आरोग्यविषयक बाबींसाठी संपूर्ण गावाला इतरत्र जावे लागत आहे, हे भयानक वास्तव आहे. येथे शेतकर्यांसाठीचा खाडी पार करणारा पूल कोसळला आहे, त्यामुळे पलीकडे जायचे असेल तर खाडीतून जावे लागते किंवा वाहतुकीच्या पुलावरुन पलीकडे जावे लागते. गावातील बहुतेक तरुण मंडळी गोडाऊनमध्ये काम करतात, तर काही न्हाहा-शेवा बंदरात.
अवजड जड माल वहातुकदारांच्या बेजबाबदारपणे वाहने चालविल्यामुळे गावात अनेक अपघात होतात.
पाणी व्यवस्था :- बहुंताशी पाणीपुरवठा पुनाडे धरणातून होतो, परंतु जेव्हा तो खंडित होतो तेंव्हा गावातील सार्वजनिक विहिरी आणि घोलातील असलेल्या डोर्यांवर अवलंबून रहावे लागते. तेथे पाण्याचा उपसा झाला तर बाभळीवर, तेथे नसेल तर थेट चोंडी गावाला जावे लागते.
विजेची सोय :- गावात नेहमीच भार नियमन चालू असते. अनेकदा, विशेषत:पावसाळ्यामध्ये गावातील लोकांना अंधारात रहावे लागते. दरवर्षी येथे बिघाड होतोच. .