Jump to content

"डीएलएड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डीएलडी म्हणजे डिप्लोमा इन एलिमेन्टरी एज्युकेशन. हा शिक्षणशास्त...
(काही फरक नाही)

१५:०२, २८ जून २०१५ ची आवृत्ती

डीएलडी म्हणजे डिप्लोमा इन एलिमेन्टरी एज्युकेशन. हा शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण देणारा महाराष्ट्रातील एक अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पुरा करणार्‍याला, शिक्षणसेवक या महिन्याला १२०० रुपये वेतन असलेल्या पदावर हमखास नोकरी मिळ्त असे.

मात्र, सन २००० नंतर ‘डीएलएड’ झालेले विद्यार्थी प्रचंड संख्येने बाहेर पडले. या सर्वांना सामावून घेता येईल, एवढ्या प्रमाणात नोकर्‍या उपलब्ध झाल्या नाहीत. सध्या महाराष्ट्रात सुमारे पाच लाखांवर ‘डीएलएड’ पदवीधारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

या अभ्यासक्रमासाठी एकेकाळी मोठ्या रांगा लागत होत्या. त्यासाठी खासगी महाविद्यालयात देणगी देऊन प्रवेश मिळवावा लागत होता. मात्र इ.स. २०१२ साली न्यायालयाने शिक्षणसेवकांना अशा प्रकारे कमी पगारावर राबवून घेण्यास विरोध दर्शविल्यामुळे शिक्षणसेवकांची भरती थांबली आणि त्यामुळे ‘डी.एल.एड.’च्या अभ्यासक्रमाचे आकर्षण मावळत गेले. त्यामुळे २०१४-१५ या वर्षात महाराष्ट्रातील १००हून अधिक संस्थाचालकांनी ही महाविद्यालये बंद केली.

२०१५-१६ या शैक्षणिक वर्षात डीएलडी अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील ६६ हजार ६२० जागांसाठी केवळ ५ ते ६ हजारच अर्ज प्राप्त झाले. १ जून ते १६ जून २०१५ या प्रवेश-काळात पुणे विभागात तर फक्त १ हजार ४५९ प्रवेश अर्ज दाखल झाले.

२०१४-१५ या वर्षी महाराष्ट्रात १०६१ ‘डीएलएड’ महाविद्यालये होती, त्यांतली बरीचशी कॉलेजे २०१५ साली विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर होती.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळण्याची शाश्‍वती उरलेली नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे ओढा कमी झाला आहे.

हेही पहा