Jump to content

"मीनल परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. मीनल परांजपे या आकाशवाणीवर ३५ वर्षे काम करणार्य़ा नाट्य‍अभि...
(काही फरक नाही)

१५:२४, १९ जून २०१५ ची आवृत्ती

डॉ. मीनल परांजपे या आकाशवाणीवर ३५ वर्षे काम करणार्य़ा नाट्य‍अभिनेत्री विमल जोशी यांच्या कन्या आहेत. डॉ. परांजपे यांनी कौटिल्यीय अर्थशास्त हा विषय घेऊन पीएच.डी केले आहे.

डॉ. मीनल परांजपे यांनी काही वर्षांपूर्वी इंंग्रजी भाषा शिकवण्याचा नेहमीची रुळलेला मार्ग बदलून, मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करत 'फंक्शनल इंग्लिश'चा कोर्स डिझाईन केला. त्यांचा हा प्रयत्‍न मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक बनला.

'फंक्शनल इंग्लिश'चा कोर्स’ची वैशिष्ट्ये

इयत्ता तिसरी ते आठवी असा सलग सहा वर्षांचा हा कोर्स आहे. यात तिसरीव्यतिरिक्त पुढच्या वर्गातल्या मुलांना प्रवेश दिला जात नाही. आठवड्यातून तीन दिवस दररोज दीड तास असा हा वर्ग संपूर्ण वर्षभर चालवला जातो.

विशेष म्हणजे या कोर्समध्ये (b-o-o-k अशी शब्दाची मोडतोड करून बुक म्हणजे पुस्तक) असे न शिकवता हातात पुस्तक घेऊन थेट बुक असेच शिकवले जाते. त्यामुळे इंग्रजी बोलताना मराठी वाक्याचे इंग्रजी करण्याच्या मानसिक प्रक्रियेचा प्रश्नच इथे येत नाही. श्रवण, लेखन, संभाषण आणि वाचन या 'चतुःसूत्री'तून विद्यार्थी आठवीपर्यंत अगदी उत्तम इंग्रजी शिकतो. विशेष म्हणजे पालकांनी मुलांना या वर्गानंतर मार्गदर्शन करू नये अथवा घरी उजळणीदेखील घेण्याची गरज नाही, असेही सांगितले जाते. त्यामुळे घोकंपट्टी करायला मनाई असते. आठवीनंतर या कोर्स शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत केला जातो आणि नंतर 'लिफ्ट' मिळालेला विद्याथीर् सहज पुढे जातो. कोर्स पूर्ण केल्यानंतर केंब्रिज विद्यापीठाकडून घेतली जाणारी 'यंग लर्नर्स टेस्ट' मुलांना द्यावी लागते आणि तिच्यात ते सहज उत्तीर्ण होतात.

या अभ्यासक्रमाला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे.

'फंक्शनल इंग्लिश'चा कोर्स’हा अभ्यासक्रम अंमलात आणणार्‍या अनेक शिक्षण संस्था आहेत. त्यांपैकी काही या :-

  • सातपूरच्या कामगार नगरातील आनंद निकेतन
  • नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ
  • नाशिकची मोहिनीदेवी रुंगठा शाळा
  • नाशिकरोडची नवीन मराठी शाळा
  • चिपळूणची युनायटेड इंग्लिश स्कूल, वगैरे.


(अपूर्ण)