"शीला कौल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: शीला कौल (जन्म : ७ फेब्रुवारी, १९१५; मृत्यू : १३ जून, २०१५) या भारताच्... |
(काही फरक नाही)
|
१६:१४, १६ जून २०१५ ची आवृत्ती
शीला कौल (जन्म : ७ फेब्रुवारी, १९१५; मृत्यू : १३ जून, २०१५) या भारताच्या माजी मंत्री होत्या. जवाहरलाल नेहरू यांच्या त्या मेहुणी होत्या. हिमाचल प्रदेशाच्या त्या राज्यपाल होत्या.
शीला कौल यांचे शिक्षण लाहोर येथून झाले. त्या बी.ए.बी.टी होत्या..
त्यांच्या पतीचे नाव कैलाशनाथ कौल. ते वनस्पतिशास्त्रज्ञ होते. उत्तर प्रदेश राज्याच्या माजी माहिती आणि प्रसारण मंत्री दीपा कौल ही शीला कौल यांची कन्या, माजी सेवानिवृत्त सनदी अधिकारी गौतम कौल आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशासक विक्रम कौल हे दोन त्यांचे पुत्र होत.
वयाच्या १०१व्या वर्षी गाझियाबाद येथे शीला कौल यांचे निधन झाले.
शीला कौल यांची राजकीय कारकीर्द
- भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समाजकल्याण खात्याच्या राज्यमंत्री (१९८२-१९८९)
- युनेस्कोतील सहभागासाठी निर्माण केलेल्या भारतीय राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष (१९८२-१९८९)
- केंद्रीय मंत्रिमंडळात नागरी विकास आणि रोजगार मंत्री (१९९५)
- हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल (१९९५-१९९६)