"मुजीब रिझवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: मुजीब रिझवी (जन्म : चैल-अलाहाबाद, १९३४; मृत्यू : २०१५) हे जामिया मिलि... |
(काही फरक नाही)
|
२३:०६, १४ जून २०१५ ची आवृत्ती
मुजीब रिझवी (जन्म : चैल-अलाहाबाद, १९३४; मृत्यू : २०१५) हे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात प्र-कुलगुरू आणि भाषा व मानवविद्या विभागाचे अधिष्ठाता होते. जामिया मिलियात ३० वर्षे हिंदी विभागाचे प्रमुखपद सांभाळले.
जामिया मिलियात त्यांनी कवी जयासी यांच्या 'पद्मावत'वर पीएच.डी. केली.
रिझवी हे मध्ययुगीन अवधी व ब्रज कवितांमधील तज्ज्ञ होते. मोगलपूर्व काळातील सुफी काव्य आख्यान तसेच कबीरदास, तुलसीदास, अमीर खुस्रो यांच्यावर त्यांनी बरेच लेखन केले आहे. सोळाव्या शतकातील हिंदूी कवी मलिक महंमद यांच्यावर ते अधिकारवाणीने बोलत.
मुस्लिमांमधील खरे निधर्मी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांनी आचरणातून निधर्मवाद जोपासला. ते राष्ट्रवादी मुस्लीम होते, केवळ पुस्तकी शिक्षक नव्हते, अनुभवी शिक्षक व गांधीवादी होते, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते देशी विद्वान होते.
मुजीब रिझवी यांनी लिहिलेली पुस्तके
- भारत में अंग्रेजी राज (या पुस्तकावर ब्रिटिशांनी बंदी घातली होती.)
- हाऊ इंडिया लॉस्ट हर फ्रीडम
(अपूर्ण)