"बाबा पाठक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: आर.व्ही ऊर्फ बाबा पाठक (जन्म : औंध संस्थान, १३ जून १९१४; हयात) हे एक म... |
(काही फरक नाही)
|
२१:५१, १४ जून २०१५ ची आवृत्ती
आर.व्ही ऊर्फ बाबा पाठक (जन्म : औंध संस्थान, १३ जून १९१४; हयात) हे एक मराठी चित्रकार आहेत. त्यांचा १०१वा वाढदिवस साजरा झाला आहे.
औंध संस्थानातील कलाप्रेमी संस्थानिक
स्वातंत्र्यापूर्वीच्या औंध संस्थानात पंतप्रतिनिधींसारख्या कर्तबगार, कलाप्रेमी आणि गुणग्राहक संस्थानिकामुळे अनेक चित्रकार-शिल्पकार उदयास आले. देवधर मास्तर, माधवराव सातवळेकर, व्ही. के. पाटील हे बाबा पाठकांचे आद्य कलागुरू. पुढे बाबा पाठक बडोद्याला 'कलाभवन'मध्ये दाखल झाले आणि त्यांनी चित्रकारितेतील पदविका प्राप्त केली.
स्वातंत्रलढ्यात उडी
बडोद्याहून पुण्यात आल्यावर बाबा पाठकांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. त्यांच्या नावे अटकेचे वॉरंट निघाल्याने ते काही वष्रे भूमिगत झाले.
कलाकृती निर्मितीचा व्यवसाय
बाबा पाठक यांनी आर्थिक चणचणीतून सुटका मिळवण्यासाठी स्वतःचे कलाप्रेम, प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता यांचा संगम साधत कोल्ड सिरॅमिक्स आणि म्यूरल्स तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कलाकृती देशात सर्वत्र तसेच हाँगकाँग, दुबई, सिंगापूर येथेही विराजमान झाल्या. व्यावसायिक यशाचा हा आलेख चढत असतानाच बाबांना त्यांची मूळ कलाप्रेरणा असणारी चित्रकला खुणावत होती. त्यांनी आपला यशोशिखराकडे जात असलेला व्यवसाय थांबवला आणि स्वतःला चित्रकलेत गुरफटून घेतले.