"के.व्ही. कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: कुंडापूर वामन कामत (जन्म : मंगलोर, २ डिसेंबर, १९४७) हे ब्रिक्स बँके... |
(काही फरक नाही)
|
०७:३८, ५ जून २०१५ ची आवृत्ती
कुंडापूर वामन कामत (जन्म : मंगलोर, २ डिसेंबर, १९४७) हे ब्रिक्स बँकेचे पहिले अध्यक्ष आहेत.
के.व्ही. कामत यांची मातृभाषा कोकणी आहे. कर्नाटकातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' या संस्थेतून ते मेकॅनिकल इंजिनियर झाले, नंतर अहमदाबादच्या आयआयएममध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली.
कारकीर्द
बॅंकिंग क्षेत्रातील कामतांची कारकीर्द आयसीआयसीआय बँकेपासून सुरू झाली. नंतर त्यांनी मनिला येथे आशियाई विकास बँकेत काम केले, तो त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय अनुभव होता. १९९६ मध्ये ते पुन्हा आयसीआयसीआय बँकेत आले. इन्फोसिस कंपनीत त्यांनी विविध पदांवर काम केले.
आयसीआयसीआय बँकेत असताना कामत यांनी चंदा कोचर यांच्यासारख्या महिला बँकर्सना घडवले.
के.व्ही. कामत यांनी एक छोटी बँक असलेली आयसीआयसीआय बँक देशातील दुसरी मोठी बँक म्हणून नावारूपास आणली.
ब्रिक्स बॅंक
ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका यांना 'ब्रिक्स देश' असे म्हटले जाते. या देशांतील पायाभूत प्रकल्पांना मदत करण्यासाठी 'ब्रिक्स' बँकेची स्थापना करण्यात आली. कामत तिचे पहिले अध्यक्ष आहेत.
या बॅंकेत चीनचे १०० अब्ज डॉलर इतके भांडवल असल्याने बँकेचे मुख्यालय चीनमध्ये शांघाय येथे आहे.
पुरस्कार
के.व्ही. कामत यांचा २००८ मध्ये भारत सरकारने 'पद्मभूषण' देऊन गौरव केला आहे.