Jump to content

"एकनाथ आव्हाड (बालसाहित्य लेखक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|एकनाथ आव्हाड}} एकनाथ आव्हाड हे एक कवी आणि बालसाहित्यिक आह...
(काही फरक नाही)

१३:५७, २५ मे २०१५ ची आवृत्ती


एकनाथ आव्हाड हे एक कवी आणि बालसाहित्यिक आहेत. त्यांच्या बोधाई या लहान मुलांच्या पुस्तकामुळे ते मुलांचे आणि पालकांचेही लाडके झाले आहे. महापालिका शाळेत शिक्षक असलेले आव्हाड सुट्ट्य़ांमधे कथाकथनाचे कार्यक्रम करतात. पैसे मिळण्यासाठी कथाकथन करणारे अनेक जण असतात. पण आव्हाड हे कमला मेहता अंधशाळेत, आदिवासी पाड्यांवर, कुष्ठधामात विनामूल्य आपले कार्यक्रम सादर करत असतात.

त्यांच्या या धडपडीचं साने गुरुजी पुरस्काराने कौतुकही झाले आहे. उत्कृष्ट शिक्षकाचा महापौर पुरस्कार मिळवणारे ते सर्वात तरुण शिक्षक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं. सुट्ट्या आणि शाळेनंतरचा वेळ ते बालदोस्तांसाठी ते खर्च करतात. शिक्षकांनाही ते कथाकथनातले बारकावे शिबिरे घेऊन सांगतात. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाने त्यांचं ’गंमत गाणी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. तीन ते पाच वर्षं वयोगटातील मुलांसाठी लिहिलेलं जोडाक्षरविरहित असे हे पुस्तक आहे. त्यांच्या या पुस्तकाला विजया वाड यांच्याही शुभेच्छा लाभल्या आहेत.

एकनाथ आव्हाड यांची प्रकाशित पुस्तके

  • अक्षरांची फुले (बालकविता)
  • गंमतगाणी (बालकविता)
  • नव्याने बहरावे (बालकविता)
  • निष्फळ भांडण (बालसाहित्य)
  • पंख पाखराचे (बालकविता)
  • बोधाई (बालसाहित्य)
  • राजा झाला जंगलाचा (बालकथासंग्रह)
  • हसरे घर (बालकविता)


पुरस्कार

  • उत्कृष्ट शिक्षकांसाठीचा महापौर पुरस्कार
  • साने गुरुजी पुरस्कार