Jump to content

"अशोक पाटोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अशोक पाटोळे (जन्म: गिरगाव (मुंबई), ५ जून, १९४८; मृत्यू : मुंबई, १२ मे. २...
(काही फरक नाही)

१०:५५, २३ मे २०१५ ची आवृत्ती

अशोक पाटोळे (जन्म: गिरगाव (मुंबई), ५ जून, १९४८; मृत्यू : मुंबई, १२ मे. २०१५) हे एक मराठी कथाकार आणि नाटककार होते.

पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. त्यांनी लिहिलेली पहिली कथा 'नवाकाळ' या दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे 'श्री दीपलक्ष्मी', साप्ताहिक मार्मिक' आदी नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या. पाटोळे ह्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचेही लेखन केले होते.

पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. 'झोपा आता गुपचूप' हे त्यांचे पहिले नाटक.

अशोक पाटोळे यांनी लिहिलेली नाटके

  • अग्निदिव्य
  • आईतुला मी कोठे ठेवू?
  • आई रिटायर होते
  • एक चावट संध्याकाळ
  • चारचौघांच्या साक्षीने
  • झोपा आता गुपचूप
  • तांदूळ निवडता निवडता
  • दांडेकरांचा सल्ला
  • दुर्गाबाई जरा जपून
  • देखणी बायको दुसर्‍याची
  • प्रेम म्हणजे लव्ह असतं
  • बा रिटायर थाय छे (गुजराथी)
  • बे दुणे पाच
  • माणसा माणसा हूप
  • मी माझ्या मुलाचा
  • श्यामची मम्मी
  • हीच तर प्रेमाची गंमत आहे

कथासंग्रह

  • सातव्या मुलीची सातवी मुलगी

कवितासंग्रह

  • पाटोळ्यांच्या पाचोळ्या

अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या दूरचित्रवाणी मालिका

  • चुनौती (हिंदी)
  • श्रीमान श्रीमती (हिंदी)


अशोक पाटोळे यांच्या पटकथा, संवाद असलेले चित्रपट

  • मझी पती करोडपती


(अपूर्ण)