"स.अ. शुक्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सदाशिव अनंत शुक्ल (जन्म : २६ मे, इ.स. १९०२; मृत्यू : २७ जानेवारी, इ.स. १९... |
(काही फरक नाही)
|
१९:३०, २० मे २०१५ ची आवृत्ती
सदाशिव अनंत शुक्ल (जन्म : २६ मे, इ.स. १९०२; मृत्यू : २७ जानेवारी, इ.स. १९६८) हे मराठीतले एक कवी, व ध्येयवादी नाटककार होते. त्यांनी कविता-नाटकांशिवाय लघुकथा, चित्रपटकथा, गाणी आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचे लेखन केले आहे. केवळ लेखनावर उपजीविका करणार्या महाराष्ट्रातील मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते.
स.अ. शुक्ल यांनी कुमुदबांधव या टोपणनावानेही काही कविता केल्या आहेत. गीतकार म्हणूनही त्यांनी चांगला लौकिक मिळवला. त्यांच्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या . त्यांनी लिहिलेल्या चित्रपटकथा भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या असत.
नाट्यलेखन
स.अ. शुक्ल यांची काही नाटके जरी पौराणिक विषयांवर असली तरी त्यांतूनही त्यांनी प्रचलित सामाजिक जाणिवेला नवा अर्थ देण्याचा प्रयत्न केला.
स.अ. शुक्ल यांनी लिहिलेली नाटके
- वीर अभिमन्यू (मुलांसाठी नाटिका)
- चंद्रावर मधुचंद्र
- चार चांदण्या (एकांकिका संग्रह)
- जंगल्या भिल्ल (मुलांसाठी नाटिका)
- जनता अमर आहे
- जयद्रथ वध (मुलांसाठी नाटिका)
- नवलनगरची राजकन्या (मुलांसाठी नाटिका)
- नाटक...नाटक (मुलांसाठी नाटिका)
- बनला बैरागी राजा (मुलांसाठी नाटिका)
- सं. साध्वी मीराबाई (१९३०)
- रंगतरंग
- लोकसिंहासन (सामाजिक नाटक, १९४६)
- शिकलेले शहाणे
- सं. सत्याग्रही (१९३०)
- सम्राट कोण
- सं. साक्षात्कार (१९३०)
- सिंहाचा छावा (१९२७)
- सं. सौभाग्यलक्ष्मी (सामाजिक नाटक, १९२५)
- स्वर्गावर स्वारी (१९२८)
(अपूर्ण)