"वऱ्हाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|वर्‍हाड (लग्नाचे)}} वर्‍हाड म्हणजे इंग्रजीत Berar. निजामाच्या...
(काही फरक नाही)

१४:२१, २० मे २०१५ ची आवृत्ती

वर्‍हाड म्हणजे इंग्रजीत Berar. निजामाच्या ताब्यात असलेला हल्लीच्या खानदेश-विदर्भातला हा प्रदेश. वर्‍हाडात प्रामुख्याने अमरावती जिल्हा येई. त्याशिवाय खानदेशातील जळगाव व खामगाव ही गावे आणि हल्लीच्या विदर्भातील अकोला, अमरावती, एलिचपूर, बुलढाणा, वाशीम, बडनेरा, कारंजा ही गावे वर्‍हाडात मोडत. एलिचपूर ही वर्‍हाडची राजधानी होती.

पुढे वर्‍हाड ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. त्यांनी ते मध्य प्रांतात सामील करून सेन्ट्रल प्रॉव्हिन्स अॅन्ड बेरार नावाचा प्रांत बनवला. भाषावार प्रांतरचनेनंतर वर्‍हाड महाराष्ट्रात समाविष्ट झाले.

विदर्भालाच चुकून वर्‍हाड असे म्हटले जाते, पण वर्‍हाड म्हणजे विदर्भ नव्हे.