Jump to content

"त्र्यं.सी. कारखानीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: त्र्यंबक सीताराम कारखानीस (जन्म : १५ एप्रिल इ.स. १८७४; मृत्यू : ८ जान...
(काही फरक नाही)

२३:४१, १९ मे २०१५ ची आवृत्ती

त्र्यंबक सीताराम कारखानीस (जन्म : १५ एप्रिल इ.स. १८७४; मृत्यू : ८ जानेवारी, इ.स. १९५६) हे एक मराठी नाट्य अभिनेते आणि नाटककार होते. पुण्यातील न्य़ू इंग्लिश स्कूलमधील शिक्षकाची नोकरी सोडून, सर्वसामान्य जनतेसमोर तेजस्वी आदर्श चांगल्या संस्कृतीचा ठसा उमटावा व त्यांच्यात वाङ्‌मयीन अभिरुची निर्माण व्हावी म्हणून त्र्यं.सी. कारखानीस यांनी ’महाराष्ट्र नाटक मंडळी’ स्थापन केली.

अनेक नाटकांतून भूमिका करत असताना आपण काहीतरी वेगळे करावे असे त्यांना वाटे. आपल्याला ज्या प्रकारची भूमिका करावयाची आहे, त्याप्रकारची भूमिका असलेले नाटक कुणीतरी लिहावे आणि आपण ती भूमिका सर्व ताकदीनुसार दमदारपणे रंगमंचावर सादर करावी असे त्यांना वाटे. पण त्या काळी नाट्यकलेचेचा पुरेसा विकास झाला नसल्याने कारखानीसंची ती इच्छा ्पूर्ण होऊ शकत नव्हती. शेवटी आपणच तसे नाटक लिहावे, या विचाराने ते नाटककार झाले. ’राजाचे बंड’ हे त्यांचे वेगळ्या प्रकारचे पहिले नाटक खूप गाजले. त्या यशानंतर त्यांनी अनेक नाटके लिहिली आणि रंगभूमीवर यशस्वी करून दाखवली.

त्र्यं.सी. कारखानीस यांनी लिहिलेली नाटके

  • राजाचे बंड
  • स्वैरिणी (अंबाहरण या कथानकावर आधारित हे नाटक रंगमंचावर येऊ शकले नाही!)

त्र्यं.सी. कारखानीस यांचा अभिनय असलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)

  • कांचनगडची मोहना (हंबीरराव)
  • कीचकवध (विराट)
  • प्रेमसंन्यास (कमलाकर, जयंत)
  • भाऊबंदकी (सखारामबापू)
  • सवाई माधवरावांचा मृत्यू (माधवराव)

सन्मान

त्र्यं.सी. कारखानीसांनी नट आणि नाटककार म्हणून, आणि नाट्यसंस्था स्थापना करून, मराठी रंगभूमीची जी सेवा केली तिचे फळ म्हणून त्यांना नागपूर येथे इ.स. १९३९ साली भरलेल्या ३०व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला.