"अनंत हरि गद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
==आद्य नाटिका लेखक== |
==आद्य नाटिका लेखक== |
||
अनंत हरी गद्रे नाट्यसृष्टीत येण्यापूर्वी मराठी रंगभूमी ही मोठ्या नाटकांची होती. तेव्हाचे नाटक पाच सात अंकांचे आणि रात्रभर चालणारे असे. लोकांना त्याची सवय झाली होती आणि त्यांच्याकडे तेवढा वेळही असे. दरम्यानच्या काळात तीन तासात भरपूर मनोरंजन करणारे बोलपट |
अनंत हरी गद्रे नाट्यसृष्टीत येण्यापूर्वी मराठी रंगभूमी ही मोठ्या नाटकांची होती. तेव्हाचे नाटक पाच सात अंकांचे आणि रात्रभर चालणारे असे. लोकांना त्याची सवय झाली होती आणि त्यांच्याकडे तेवढा वेळही असे. दरम्यानच्या काळात तीन तासात भरपूर मनोरंजन करणारे बोलपट आले आणि लोक नाटके पहायच्या ऐवजी सिनेमे पाहू लागले. तशातच संगीत नाटकांत गाण्यांना दिलेल्या ’वन्समोअर’मुळे रेंगाळत चाललेल्या गाण्यांचाही लोकांना कंटाळा येऊ लागला. परिणामी मराठी रंगभूमी संकटात सापडली. अशा रंगभूमीच्या पडत्या काळात रंगभूमीला सावरण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांपैकी अनंत हरी गद्रे हे एक होते. रात्रभर चालणार्या नाटकांपेक्षा गद्र्यांनी एकदीड ते तीन तासात संपणार्या नाटिका लिहायला सुरुवात केली. त्यांच्या प्रेमदेवता या पहिल्या नाटिकेचा १ ऑगस्ट १९३० रोजी बालमोहन संगीत मंडळीने केलेला पहिला प्रयोग हा, या नाटिकेच्या वेगळेपणामुळे आणि त्यास लागणार्या कमी वेळामुळे प्रेक्षकांना पसंत पडला. त्यांच्या नाटिकांचे प्रयोग ’नूतन संगीत मंडळी’ आणि गद्रे यांनी स्थापित केलेली ’मुंबई नाटिका संगीत मंडळी’ या अन्य नाट्यसंस्थाही करीत असत. |
||
अनंत हरी गद्रे यांच्याकडे विविध मराठी वाक्प्रचारांचे विलक्षण भांडार होते. ते त्यांनी आपल्या जाहिरात कौशल्यासाठी वापरले. गद्र्यांच्या ’कुमारी’ या नाटिकेचे एकामागून एक असे १०१ प्रयोग झाले होते. |
|||
==पत्रकारिता आणि झुणकाभाकर चळवळ== |
==पत्रकारिता आणि झुणकाभाकर चळवळ== |
||
ओळ २५: | ओळ २९: | ||
==सन्मान== |
==सन्मान== |
||
झुणकाभाकरफेम अनंत हरी गद्रे यांनी केलेल्या नाट्यसेवेसाठी त्यांना [[मुंबई]] येथे इ.स. १९३० साली भरलेल्या २५व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन| |
झुणकाभाकरफेम अनंत हरी गद्रे यांनी केलेल्या नाट्यसेवेसाठी त्यांना [[मुंबई]] येथे इ.स. १९३० साली भरलेल्या २५व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्यसंमेलनाचा]] अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळाला. |
||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
ओळ ५४: | ओळ ५८: | ||
(अपूर्ण) |
|||
==संदर्भ व नोंदी== |
==संदर्भ व नोंदी== |
११:३४, १९ मे २०१५ ची आवृत्ती
झुणकाभाकरफेम अनंत हरी गद्रे (जन्म : १६ ऑक्टोबर, इ.स. १८९०; [१] मृत्यू : ३ सप्टेंबर, इ.स. १९६७[२]) हे वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक होते. त्यांना नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते.
आद्य नाटिका लेखक
अनंत हरी गद्रे नाट्यसृष्टीत येण्यापूर्वी मराठी रंगभूमी ही मोठ्या नाटकांची होती. तेव्हाचे नाटक पाच सात अंकांचे आणि रात्रभर चालणारे असे. लोकांना त्याची सवय झाली होती आणि त्यांच्याकडे तेवढा वेळही असे. दरम्यानच्या काळात तीन तासात भरपूर मनोरंजन करणारे बोलपट आले आणि लोक नाटके पहायच्या ऐवजी सिनेमे पाहू लागले. तशातच संगीत नाटकांत गाण्यांना दिलेल्या ’वन्समोअर’मुळे रेंगाळत चाललेल्या गाण्यांचाही लोकांना कंटाळा येऊ लागला. परिणामी मराठी रंगभूमी संकटात सापडली. अशा रंगभूमीच्या पडत्या काळात रंगभूमीला सावरण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांपैकी अनंत हरी गद्रे हे एक होते. रात्रभर चालणार्या नाटकांपेक्षा गद्र्यांनी एकदीड ते तीन तासात संपणार्या नाटिका लिहायला सुरुवात केली. त्यांच्या प्रेमदेवता या पहिल्या नाटिकेचा १ ऑगस्ट १९३० रोजी बालमोहन संगीत मंडळीने केलेला पहिला प्रयोग हा, या नाटिकेच्या वेगळेपणामुळे आणि त्यास लागणार्या कमी वेळामुळे प्रेक्षकांना पसंत पडला. त्यांच्या नाटिकांचे प्रयोग ’नूतन संगीत मंडळी’ आणि गद्रे यांनी स्थापित केलेली ’मुंबई नाटिका संगीत मंडळी’ या अन्य नाट्यसंस्थाही करीत असत.
अनंत हरी गद्रे यांच्याकडे विविध मराठी वाक्प्रचारांचे विलक्षण भांडार होते. ते त्यांनी आपल्या जाहिरात कौशल्यासाठी वापरले. गद्र्यांच्या ’कुमारी’ या नाटिकेचे एकामागून एक असे १०१ प्रयोग झाले होते.
पत्रकारिता आणि झुणकाभाकर चळवळ
दै. संदेशमध्ये वार्ताहर म्हणून काम करीत असतां टिळकांच्या होम-रूल चळवळीचे गद्र्यांनी केलेले वार्तांकन खूप लोकप्रिय झाले [३]. इ.स. १९२२ साली सुरू झालेल्या मौज ह्या साप्ताहिकातील त्यांची संपादकीये चांगलीच लोकप्रिय झाली. इ.स. १९३४ साली सुरू केलेल्या 'निर्भीड' ह्या आपल्या दुसर्या साप्ताहिकातून गद्र्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार करीत स्पृश्यास्पृश्यता आणि केशवपनासारख्या वाईट चालींवर कडाडून टीका केली. दलित आणि सवर्णांमधील सामाजिक दरी मिटवण्यासाठी 'झुणका-भाकर चळवळी'सारखे प्रयोग गद्र्यांनी केले. 'झुणका-भाकर' चळवळीमध्ये समाज्याच्या सर्व थरांतील, सर्व जातींचे लोक एकत्र येऊन भोजन करीत असत [४].
अनंत हरि गद्रे यांनी लिहिलेली पुस्तके
- अच्युतराव कोल्हटकर (चरित्र)
- आई (नाटिका)
- कर्दनकाळ (नाटक)
- कुमारी (नाटिका)
- घटस्फोट (नाटिका)
- तरुण पिढी (नाटिक)
- नाटिकानवरत्नहार (संपादित)
- मूर्तिमंत सैतान (नाटक, १९२९)
- पाहुणा (नाटक)
- पुणेरी जोडा (नाटिका)
- पूर्ण स्वातंत्र्य (नाटिका)
- प्रीतिविवाह (नाटिका)
- प्रेमदेवता (नाटिका)
- मुलींचे कॉलेज (नाटिका)
- स्वराज्यसुंदरी (नाटक, १९१९)
सन्मान
झुणकाभाकरफेम अनंत हरी गद्रे यांनी केलेल्या नाट्यसेवेसाठी त्यांना मुंबई येथे इ.स. १९३० साली भरलेल्या २५व्या मराठी नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळाला.
पुरस्कार
गद्रे यांच्या नावाने मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 'समतानंद अनंत हरी गद्रे' नावाचा पुरस्कार दिला जातो. २०१३ सालचा पुरस्कार लोकसत्ता'चे सहसंपादक संदीप आचार्य यांना मिळाला होता. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले पत्रकार :
- माधव गडकरी (१९९१)
- रंगा वैद्य (१९९२)
- यदुनाथ थत्ते (१९९३)
- नारायण आठवले (१९९४)
- मधु नाशिककर (१९९५)
- कृ.पां. सामक (१९९६)
- माया चिटणीस (१९९७)
- रामभाऊ जोशी (१९९८)
- भा.म. निंबकर (१९९९)
- भालचंद्र आकलेकर (२०००)
- दिनू रणदिवे (२००१)
- पंढरीनाथ सावंत (२००२)
- स पां. जोशी (२००३)
- संभा चव्हाण(२००४)
- दत्ताराम बारस्कर (२००५)
- वसंत लक्ष्मण गडकर (२००६)
- मधू रावकर (२००७)
- लक्ष्मण केळकर (२००८)
- सुभाष हरड (२००९)
- सतीश कामत (२०१०)
- आत्माराम नाटेकर (२०११)
- मोहन केळुस्कर (२०१२)
संदर्भ व नोंदी
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2464506. ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2335373. ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ द हिस्टरी अॅन्ड कल्चर ऑफ द इंडियन पीपल, व्हॉल्यूम ११ (भारतीय लोकांचा सांस्कृतिक इतिहास, खंड ११) | लेखक = आर.सी. मजुमदार | भाषा = इंग्लिश }}
- ^ गोखले,शांता. (इंग्लिश भाषेत). Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)