Jump to content

"य.ना. टिपणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: यशवंत नारायण टिपणीस (जन्म : ??; मृत्यू : ??) हे एक मराठी नाट्यनिर्माते,...
(काही फरक नाही)

२३:३३, १७ मे २०१५ ची आवृत्ती

यशवंत नारायण टिपणीस (जन्म : ??; मृत्यू : ??) हे एक मराठी नाट्यनिर्माते, नाट्यलेखक, अभिनेते आणि वेषभूषाकार होते. ’चंद्रग्रहण’ या नाटकाद्वारे प्रथमच अस्सल ऐतिहासिक स्वरूपात शिवाजीचा जिरेटोप रंगमंचावर आणण्याचे श्रेय टिपणिसांना जाते. टिपणिसांनी आपल्या आयुष्यात रंगमंचावरील पात्रांच्या रंगभूषा, केशभूषा आणि वेशभूषांना जास्तीत जास्त वास्तव बनवण्याचा प्रयत्‍न केला.

य.ना. टिपणिसांनी लिहिलेली नाटके

पौराणिक

  • जरासंध (१९१६)
  • नारद
  • मत्स्यगंधा (१९१३)
  • राधामाधव (१९१४)

ऐतिहासिक

  • चंद्रग्रहण (१९१८)
  • दख्खनचा दिवा (१९३६)
  • शहाशिवाजी (१९२५)
  • शिक्काकट्यार (१९२७)
  • शिवाजीला शह (१९३३)

सामाजिक

  • आशानिराशा (१९२३)
  • कमला (१९११)
  • राजरंजन (१९२५)
  • स्वस्तिक बँक (१९३२)


सन्मान

पुणे येथे १९२१ साली भरलेल्या १७व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद यशवंत नारायण टिपणीस यांनी भूषविले होते.

(अपूर्ण)