Jump to content

"विनायक कोंडदेव ओक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''विनायक कोंडदेव ओक''' ([[जन्म]] : २५ फेब्रुवारी, [[इ.स. १८४०]]; मृत्यू : [[इ.स. १९१५]]) हे [[मराठी]]तील आद्य लघु[[कादंबरीकार]] होत. 'शिरस्तेदार' ही त्यांनी लिहिलेली मराठीतली पहिली लघुकादंबरी. ती इ.स. १८८१ मध्ये प्रकाशित झाली होती.
'''विनायक कोंडदेव ओक''' ([[जन्म]] : २५ फेब्रुवारी, [[इ.स. १८४०]]; मृत्यू : [[इ.स. १९१५]]) हे [[मराठी]]तील आद्य लघु[[कादंबरीकार]] होत. 'शिरस्तेदार' ही त्यांनी लिहिलेली मराठीतली पहिली लघु[[कादंबरी]]. ती इ.स. १८८१ मध्ये प्रकाशित झाली होती.

मुलांना बहुश्रुत बनवण्यासाठी, त्यांना वाचनाचा खरा आनंद देण्यासाठी त्यांनी वाचणे आवश्यक आहे असे शालेय शिक्षणाला जोड म्हणून पूरक वाचन काय देता येईल याचा ज्यांनी विचार केला, त्यात विनायक कोंडदेव ओक यांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. विशेष म्हणजे स्वत: ओकांचे शालेय शिक्षण इंग्रजी तिसरीपर्यंतच झाले होते. दरमहा आठ रुपये पगारावर प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीला प्रारंभ केला आणि दरमहा १०० रुपये पगार असलेले शिक्षणाधिकारी म्हणून ते निवृत्त झाले.

==लेखन==
==लेखन==
इ.द. १८६०च्या सुमारास ओकांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. तो काळ मराठीत विविध विषयांवर विपुल पुस्तके प्रसिद्ध होणारा काळ नव्हता. फारशी मराठी पुस्तकेच अस्तित्वात नसल्यामुळे ‘दक्षिणा प्राइज कमिटी’ मराठी ग्रंथलेखनाला उत्तेजन देण्यासाठी पारितोषिके देत होती. शाळेतील मुलांना पुरवणी वाचन म्हणून वाचण्यासाठी मेजर कँडीसारखी शिक्षण खात्याशी संबंधित माणसे स्वतःही छोटी-छोटी पुस्तके लिहीत होती. अशा काळात ज्यांनी मुलांसाठी लिहिणे हेच आपले जीवित कर्तव्य मानले अशा मराठी लेखकांत विनायक कोंडदेव ओक हे नाव अग्रभागी घ्यावे लागते.
इ.द. १८६०च्या सुमारास ओकांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. तो काळ मराठीत विविध विषयांवर विपुल पुस्तके प्रसिद्ध होणारा काळ नव्हता. फारशी मराठी पुस्तकेच अस्तित्वात नसल्यामुळे ‘दक्षिणा प्राइज कमिटी’ मराठी ग्रंथलेखनाला उत्तेजन देण्यासाठी पारितोषिके देत होती. शाळेतील मुलांना पुरवणी वाचन म्हणून वाचण्यासाठी मेजर कँडीसारखी शिक्षण खात्याशी संबंधित माणसे स्वतःही छोटी-छोटी पुस्तके लिहीत होती. अशा काळात ज्यांनी मुलांसाठी लिहिणे हेच आपले जीवित कर्तव्य मानले अशा मराठी लेखकांत विनायक कोंडदेव ओक हे नाव अग्रभागी घ्यावे लागते. ‘दिसामाजी काही तरी ते लिहावे’ हा रामदासांचा उपदेश ओकांनी तंतोतंत पाळला होता. दररोज निदान दोन पाने तरी लेखन केलेच पाहिजे, असा त्यांनी स्वत:ला दंडक घालून घेतला होता.

==बालबोध==
विनायक कोंडदेव ऒकांनी १८८१मध्ये ‘बालबोध’ नावाचे लहान मुलांसाठी असलेले मासिक सुरू केले. या मासिकाचे ते ३४ वर्षे संपादक होते. मासिकाचा सर्व मजकूर ते स्वत:च लिहून काढीत. हे मासिक दीर्घकाळ चालले, याचे एक कारण ओकांची सुबोध शैली हे होते. स्वत: ओकांना मोरोपंतांची कविता आवडे; परंतु त्यांचे लेखन मात्र अतिशय सोप्या मराठीत असे. या मासिकातील लेखनाव्यतिरिक्त ओकांच्या नावावर अनेक पुस्तके आहेत. त्यांची संख्या पन्नासच्या जवळपास भरेल.

एकट्या ‘बालबोध’ मासिकातच चारशेहून अधिक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. छोटे-छोटे निबंध लिहून ओकांनी नव्या पिढीला शालेय पुस्तकात नसलेली माहिती दिली. आपल्या मासिकाचा उद्देश सांगताना त्यांनी लिहिले आहे, ‘शाळेत कळत नाहीत; पण तुम्हाला कळल्या पाहिजेत अशा लक्षावधी गोष्टी थोड्या थोड्या आम्ही दरखेपेला तुम्हाला अगदी सोप्या व मनोरंजक भाषेत सांगून तुमच्या अंगचे सत्गुण वाढावेत आणि दिवसेंदिवस तुम्ही शहाणे आणि सुखी व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे.’ विनायकरावांचा हा उद्देश आणि त्यांचा दीर्घोद्योग लक्षात घेतला म्हणजे साने गुरुजींचे ते पूर्वज ठरतात.

==विनायक कोंडदेव ओक यांनी लिहिलेली पुस्तके==

* अब्राहम लिंकन (चरित्र)
* अमीर अब्दुल रहिमान
* अमीर अब्दुल रहिमान (चरित्र)
* इतिहासतरंगिणी
* गद्य रत्नावली
* गद्य रत्नावली
* जावजी दादाजी चौधरी (चरित्र)
* ड्यूक ऑफ वेलिंग्टन
* ड्यूक ऑफ वेलिंग्टन (चरित्र)
* मधुमक्षिका
* पितर धि ग्रेत (चरित्र)
* फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा इतिहास
* मधुमक्षिका अथवा अनेक उपयुक्त व मनोरंजक विषयांचा संग्रह
* रोम
* वॉरन हेस्टिंग्जची गो़्ष्ट
* वॉरन हेस्टिंग्जची गो़्ष्ट
* शिरस्तेदार (लघुकादंबरी)
* शिरस्तेदार (लघुकादंबरी)

००:२१, १९ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

विनायक कोंडदेव ओक (जन्म : २५ फेब्रुवारी, इ.स. १८४०; मृत्यू : इ.स. १९१५) हे मराठीतील आद्य लघुकादंबरीकार होत. 'शिरस्तेदार' ही त्यांनी लिहिलेली मराठीतली पहिली लघुकादंबरी. ती इ.स. १८८१ मध्ये प्रकाशित झाली होती.

मुलांना बहुश्रुत बनवण्यासाठी, त्यांना वाचनाचा खरा आनंद देण्यासाठी त्यांनी वाचणे आवश्यक आहे असे शालेय शिक्षणाला जोड म्हणून पूरक वाचन काय देता येईल याचा ज्यांनी विचार केला, त्यात विनायक कोंडदेव ओक यांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. विशेष म्हणजे स्वत: ओकांचे शालेय शिक्षण इंग्रजी तिसरीपर्यंतच झाले होते. दरमहा आठ रुपये पगारावर प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीला प्रारंभ केला आणि दरमहा १०० रुपये पगार असलेले शिक्षणाधिकारी म्हणून ते निवृत्त झाले.

लेखन

इ.द. १८६०च्या सुमारास ओकांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. तो काळ मराठीत विविध विषयांवर विपुल पुस्तके प्रसिद्ध होणारा काळ नव्हता. फारशी मराठी पुस्तकेच अस्तित्वात नसल्यामुळे ‘दक्षिणा प्राइज कमिटी’ मराठी ग्रंथलेखनाला उत्तेजन देण्यासाठी पारितोषिके देत होती. शाळेतील मुलांना पुरवणी वाचन म्हणून वाचण्यासाठी मेजर कँडीसारखी शिक्षण खात्याशी संबंधित माणसे स्वतःही छोटी-छोटी पुस्तके लिहीत होती. अशा काळात ज्यांनी मुलांसाठी लिहिणे हेच आपले जीवित कर्तव्य मानले अशा मराठी लेखकांत विनायक कोंडदेव ओक हे नाव अग्रभागी घ्यावे लागते. ‘दिसामाजी काही तरी ते लिहावे’ हा रामदासांचा उपदेश ओकांनी तंतोतंत पाळला होता. दररोज निदान दोन पाने तरी लेखन केलेच पाहिजे, असा त्यांनी स्वत:ला दंडक घालून घेतला होता.

बालबोध

विनायक कोंडदेव ऒकांनी १८८१मध्ये ‘बालबोध’ नावाचे लहान मुलांसाठी असलेले मासिक सुरू केले. या मासिकाचे ते ३४ वर्षे संपादक होते. मासिकाचा सर्व मजकूर ते स्वत:च लिहून काढीत. हे मासिक दीर्घकाळ चालले, याचे एक कारण ओकांची सुबोध शैली हे होते. स्वत: ओकांना मोरोपंतांची कविता आवडे; परंतु त्यांचे लेखन मात्र अतिशय सोप्या मराठीत असे. या मासिकातील लेखनाव्यतिरिक्त ओकांच्या नावावर अनेक पुस्तके आहेत. त्यांची संख्या पन्नासच्या जवळपास भरेल.

एकट्या ‘बालबोध’ मासिकातच चारशेहून अधिक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. छोटे-छोटे निबंध लिहून ओकांनी नव्या पिढीला शालेय पुस्तकात नसलेली माहिती दिली. आपल्या मासिकाचा उद्देश सांगताना त्यांनी लिहिले आहे, ‘शाळेत कळत नाहीत; पण तुम्हाला कळल्या पाहिजेत अशा लक्षावधी गोष्टी थोड्या थोड्या आम्ही दरखेपेला तुम्हाला अगदी सोप्या व मनोरंजक भाषेत सांगून तुमच्या अंगचे सत्गुण वाढावेत आणि दिवसेंदिवस तुम्ही शहाणे आणि सुखी व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे.’ विनायकरावांचा हा उद्देश आणि त्यांचा दीर्घोद्योग लक्षात घेतला म्हणजे साने गुरुजींचे ते पूर्वज ठरतात.

विनायक कोंडदेव ओक यांनी लिहिलेली पुस्तके

  • अब्राहम लिंकन (चरित्र)
  • अमीर अब्दुल रहिमान (चरित्र)
  • इतिहासतरंगिणी
  • गद्य रत्नावली
  • जावजी दादाजी चौधरी (चरित्र)
  • ड्यूक ऑफ वेलिंग्टन (चरित्र)
  • पितर धि ग्रेत (चरित्र)
  • फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा इतिहास
  • मधुमक्षिका अथवा अनेक उपयुक्त व मनोरंजक विषयांचा संग्रह
  • रोम
  • वॉरन हेस्टिंग्जची गो़्ष्ट
  • शिरस्तेदार (लघुकादंबरी)