Jump to content

"कबूतर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४: ओळ २४:
== प्रजनन ==
== प्रजनन ==
कबुतरांचा प्रजनन काळ जवळजवळ वर्षभर आहे. हे पक्षी मिळेल ते साहित्य वापरून घरटे तयार करतात किंवा इतर पक्ष्यांनी सोडून दिलेली घरटी वापरतात.
कबुतरांचा प्रजनन काळ जवळजवळ वर्षभर आहे. हे पक्षी मिळेल ते साहित्य वापरून घरटे तयार करतात किंवा इतर पक्ष्यांनी सोडून दिलेली घरटी वापरतात.

== बाह्य दुवे ==
* [http://birds.thenatureweb.net/marathibirdnames.aspx पक्ष्यांची मराठी नावे (१)]
* [http://www.flickr.com/groups/marathi/discuss/72157612766100485/ Bird Names (English-Marathi)]
* [http://bnhs.org/bnhs/files/FINAL_BIRD_NAMES_20_FEb_2015_by_Dr_Raju_Kasambe.pdf पक्ष्यांची मराठी नावे (२)]





१६:१९, २६ मार्च २०१५ ची आवृत्ती

कबूतर
शास्त्रीय नाव कोलंबा लिविया [टीप १]
कुळ कपोताद्य [टीप २]
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश रॉक पीजन [टीप ३],
रॉक डव [टीप ४]
संस्कृत कपोत, नील कपोत

कबुतर, किंवा पारवा (शास्त्रीय नाव: Columba livia, कोलंबा लिविया ; इंग्लिश: Rock Pigeon/Rock Dove, रॉक पीजन / रॉक डव ;) , ही कपोताद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. हे साधारणतः ३२ सें. मी. आकारमानाचे, निळ्या राखाडी रंगाचे पक्षी असतात. यांच्या पंखावर दोन काळे, रुंद पट्टे असतात, तर याच्या शेपटीच्या टोकावर काळा भाग असतो, मानेवर आणि गळ्यावर हिरवे-जांभळे चमकदार ठिपके असून, पंखाखाली पांढुरका रंग असतो, यांच्या चोची काळ्या रंगाच्या असतात, डोळे आणि पाय लाल रंगाचे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात. यांचा आवाज खोल, गंभीर, गूटर-गूं, गूटर-गूं असा असतो.

या पक्ष्याच्या अनेक उपजाती आहेत, त्यातील कोलंबा लिविया डोमेस्टिका ही उपजात माणसाळलेली, पाळीव असल्याने जास्त परिचित आहे. यांच्यावर आधारलेल्या जगातील सर्व भाषांमध्ये अनेक कथा, कविता, गाणी आहेत. विशेष प्रशिक्षण दिलेले पारवे माणसासाठी संदेशवहनाचे काम चोखपणे पार पाडतात.

आढळ

कबुतरांचा जगभरातील आढळ दर्शवणारा नकाशा

हे पक्षी मूलतः युरोप, उत्तर आफ्रिका, आशिया खंडांमध्ये आढळत. लहान-मोठी शहरे, खेडी, शेतीचे प्रदेश, धान्य कोठारे, रेल्वे स्थानके, जुन्या इमारती, किल्ले, इ. सर्व ठिकाणी हे पक्षी सहजपणे राहू शकतात.

खाद्य

विविध प्रकारची धान्ये, शेंगदाणे हे कबुतरांचे प्रमुख अन्न आहे.

प्रजनन

कबुतरांचा प्रजनन काळ जवळजवळ वर्षभर आहे. हे पक्षी मिळेल ते साहित्य वापरून घरटे तयार करतात किंवा इतर पक्ष्यांनी सोडून दिलेली घरटी वापरतात.

बाह्य दुवे


  1. ^ कोलंबा लिविया (रोमन: Columba livia)
  2. ^ कपोताद्य (इंग्लिश: Columbidae, कोलंबिडे)
  3. ^ रॉक पीजन (रोमन: Rock Pigeon)
  4. ^ रॉक डव (रोमन: Rock Dove)