"माधव गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८: ओळ १८:
माधव गाडगीळ हे पर्यावणाच्या शालेय पातळीवरील अभ्यासक्रम निश्चित करणार्‍या सरकारी समितीचे अध्यक्ष आहेत.
माधव गाडगीळ हे पर्यावणाच्या शालेय पातळीवरील अभ्यासक्रम निश्चित करणार्‍या सरकारी समितीचे अध्यक्ष आहेत.


माधव गाडगीळ यांच्या पत्‍नी सुलोचना गाडगीळ या पुण्यातील ’इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मीटिऑरॉलॉजी’ मध्ये शास्त्रज्ञपदावर होत्या.
==लेखन==
==लेखन==
डॉ. माधव गाडगीळ हे मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांतून सातत्याने पर्यावरणविषक लेख लिहीत असतात. त्यांचे २१५हून अधिक संशोधन प्रबंध आणि सहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
डॉ. माधव गाडगीळ हे मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांतून सातत्याने पर्यावरणविषक लेख लिहीत असतात. त्यांचे २१५हून अधिक संशोधन प्रबंध आणि सहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
ओळ २८: ओळ ३०:
* People’s Biodiversity Registers: A Methodology Manual
* People’s Biodiversity Registers: A Methodology Manual
* This Fissured Land
* This Fissured Land

==मराठी लेखन==
* निसर्ग, विज्ञान आणि प्रजातंत्र - माधव गाडगीळ यांची दैनिक लोकसत्तेतील साप्ताहिक लेखमाला (सुरुवात : १० ऑगस्ट २०१३)[http://www.loksatta.com/sampadkiya-news/nature-science-and-democracy-170589/#]

==मराठी पुस्तके==
* मुंग्या आणि माणसाच्या जीवनशैलीतले साम्य शोधणार्‍या ’अ‍ॅन्टहिल’ पुस्तकाचा अनुवाद असलेले ’वारूळपुराण’
* विविधता – जीवनाची कोनशिला (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक प्रा. रा.वि. सोवनी)

==चरित्र==
* विज्ञानयात्री डॉ. माधव गाडगीळ (लेखक : अ.पां. देशपांडे)




==गाडगीळ यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
==गाडगीळ यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==

१९:२३, २५ मार्च २०१५ ची आवृत्ती

माधव धनंजय गाडगीळ (जन्म : पुणे, महाराष्ट्र, भारत), इ.स. १९४२) हे जागतिक कीर्तीचे मराठी पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत.

शिक्षण

माधव गाडगीळ यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. पुणे, मुंबई या विद्यापीठांतून जीवशास्त्राच्या पदव्या घेऊन नंतर हॉर्वर्ड विद्यापीठातून मॅथेमॅटिकल इकॉलॉजी या विषयात त्यांनी पीएच.डी मिळवली. ते हॉर्वर्ड विद्यापीठाच्या आयबीएम संगणन केंद्राचे आणि शिवाय उपयोजित गणित शास्त्रशाखेचे फेलो आहेत.

कारकीर्द

इ.स. १९७३ ते२००४पर्यंत माधव गाडगीळ बंगलोरच्या इंडियन इनस्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. तेथे असताना त्यांनी ’सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची स्थापना केली. हॉर्वर्ड विद्यापीठात ते जीवशास्त्र शिकवीत असत. शिवाय अमेरिकेतील स्टॅनफोर्ड आणि बर्कले विद्यापीठांचे ते पाहुणे प्राध्यापक होते.

विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाची जागृती निर्माण व्हावी यासाठी माधव गाडगीळ यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या साहाय्याने देशातील जैवविविधतेचे सर्वेक्षण आणि संवर्धन या विषयांवर काय काय करता येईल त्याचे अभिनव प्रयोग केले आहेत.

संशोधन

लोकसंख्येचे जीवशास्त्र, सर्वसाधारण पर्यावरण, पर्यावरण-संरक्षण, पर्यावरणाची मानवी बाजू आणि ऐतिहासिक पर्यावरण हे प्रा.डॉ. माधव गाडगीळ यांचे संशोधनाचे विषय आहेत. .

जीवशास्त्र व पर्यावरण शास्त्रज्ञ, संशोधक, अध्यापक, शेतकरी, सामान्य जनता, पर्यावरणाशी संबंधित बिनसरकारी संस्था आणि राष्ट्रीय पर्यावरण धोरणे आखणारे सरकारी आणि संस्थाकीय अधिकारी यांच्याशी माधव गाडगीळ यांचा सततचा संपर्क असतो.

माधव गाडगीळ हे सह्याद्री पर्वतभागाच्या पर्यावरणीय अहवाल समितीचे (गाडगीळ कमिशनचे) अध्यक्ष होते. भारतातल्या ’पहिले जैवशास्त्रीय संरक्षित वन या कल्पनेचे ते जनक आहेत.

माधव गाडगीळ हे पर्यावणाच्या शालेय पातळीवरील अभ्यासक्रम निश्चित करणार्‍या सरकारी समितीचे अध्यक्ष आहेत.

माधव गाडगीळ यांच्या पत्‍नी सुलोचना गाडगीळ या पुण्यातील ’इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मीटिऑरॉलॉजी’ मध्ये शास्त्रज्ञपदावर होत्या.

लेखन

डॉ. माधव गाडगीळ हे मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांतून सातत्याने पर्यावरणविषक लेख लिहीत असतात. त्यांचे २१५हून अधिक संशोधन प्रबंध आणि सहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

माधव गाडगीळ यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके

  • Diversity : The cornerstone of life
  • Ecological Journeys
  • Ecology and Equity
  • Nurturing Biodiversity: An Indian Agenda
  • People’s Biodiversity Registers: A Methodology Manual
  • This Fissured Land

मराठी लेखन

  • निसर्ग, विज्ञान आणि प्रजातंत्र - माधव गाडगीळ यांची दैनिक लोकसत्तेतील साप्ताहिक लेखमाला (सुरुवात : १० ऑगस्ट २०१३)[१]

मराठी पुस्तके

  • मुंग्या आणि माणसाच्या जीवनशैलीतले साम्य शोधणार्‍या ’अ‍ॅन्टहिल’ पुस्तकाचा अनुवाद असलेले ’वारूळपुराण’
  • विविधता – जीवनाची कोनशिला (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक प्रा. रा.वि. सोवनी)

चरित्र

  • विज्ञानयात्री डॉ. माधव गाडगीळ (लेखक : अ.पां. देशपांडे)


गाडगीळ यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • भारताच्या पश्चिम घाटातील पर्यावरणावरी केलेल्या अभ्यासाबद्दल नॅशनल एनव्हायरमेम्ट फेलोशिप
  • १९८६ ते १९९० या काळात भारताच्या पंतप्रधानांच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे सदस्यत्व
  • १९९८पासून ते २००२पर्यंत जागतिक पर्यावरण सल्लागार समितीचे सभासदत्व
  • भारतीय विज्ञान अकादमीची व थर्ड वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेसची फेलोशिप.
  • अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान प्रबोधिनीचे विदेशातले सहकारीपद
  • ब्रिटिश आणि अमेरिकन इकॉलॉजिकल सोसायटींचे मानद सदस्यत्व.
  • जीवशास्त्रांसाठीचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार
  • विक्रम साराभाई पुरस्कार
  • ईश्वरचंद्र विद्यासागर पुरस्कार
  • हॉर्वर्ड विद्यापीठाचे अपूर्व असे शतवार्षिक पदक
  • व्होल्व्हो आंतरराष्ट्रीय पारितोषिक (२००३)
  • भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार
  • कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार
  • विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अत्युच्च प्रावीण्याबद्दल फिरोदिया पुरस्कार (२००७)
  • उष्णकटिबंधीय जीवशास्त्र आणि त्याचे संरक्षण या विषयांवर केलेल्या संशोधनात्मक कामगिरीसाठी ATBC (असोसिएशन फॉर ट्रॉपिकल बायॉलॉजी अॅन्ड कॉन्झर्व्हेशन) या संस्थेची मानद फेलोशिप (२०१०)
  • पर्यावरणशास्त्रात केलेल्या कामगिरीसाठी सदर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीचा टेलर पुरस्कार (Tyler Award (२०१५)

अपमान

  • सोनिया गांधी यांनी त्राष्ट्रीय सल्लागारपद समितीतून माधव गाडगीळ यांची त्यांच्या प्रामाणिक व निस्पृह सल्ल्यांबदल हकालपट्टी केली.
  • डोंगर-दर्‍यातून हिंडून सह्याद्री पर्वताच्या पर्यावरणाचा गाडगीळ यांनी तयार केलेला अभ्यासपूर्ण ’गाडगीळ अहवाल’ महारष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने फेटाळला आणि त्याजागी कस्तुरीरंगन यांनी कार्यालयात बसून उपग्रह चित्रणांवरून तयार केलेला अहवाल स्वीकारला.