"नेपाळचा प्रवास (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: बडोद्याच्या गायकवाड संस्थानिकांच्या कुटुंबातील एक सदस्य संपतर... |
(काही फरक नाही)
|
००:०१, ९ मार्च २०१५ ची आवृत्ती
बडोद्याच्या गायकवाड संस्थानिकांच्या कुटुंबातील एक सदस्य संपतराव गायकवाड १९२५ साली नेपाळला गेले होते. त्यावर आधारित त्यांनी एक व्याख्यान बडोदे येथील सहचारिणी सभेचा अध्यक्ष या नात्याने दिले. नंतर त्यांनी ते पुस्तिकारूपाने प्रसिद्ध केले. पुढे काही दिवसांनी काही पुस्तकांच्या साहाय्याने त्यात अधिक माहिती घालून 'नेपाळचा प्रवास' हे पुस्तक तयार झाले. इ.स. १९२८मध्ये ते प्रकाशित झाले.
’नेपाळचा प्रवास’ या पुस्तकात १६ प्रकरणे आहेत. नेपाळचे भौगोलिक स्थान, नेपाळचा इतिहास, नेपाळमधील धर्म, हिंदू लोक, भाषा, खाद्यपेये, सण व उत्सव, विवाहपद्धती, शासनपद्धती, पोशाख आदी सामाजिक परिस्थितीचे बरेच तपशील त्यात आहेत. नंतरच्या अध्र्या भागात नेपाळचा प्रवासमार्ग, प्रमुख शहरे, प्रेक्षणीय स्थळे, अर्वाचीन नेपाळ, माझा नेपाळमधील अनुभव आणि सर्वात शेवटी 'नेपाळच्या राजांची वंशावळ' असा एकंदर मजकूर आहे.
प्रवासवर्णनापेक्षा नेपाळवर लिहिलेले पुस्तक असे याचे स्वरूप आहे. एका श्रीमंत संस्थानच्या साध्या स्वभावाच्या संस्थानिकाने १९२८ साली लिहिलेले हे पुस्तक मुळातूनच वाचावयास हवे.