"रिंगणनाट्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: अतुल पेठे व राजू इनामदार यांच्या संकल्पनेतून अंधश्रद्धा निर्मू... |
(काही फरक नाही)
|
१४:३३, २५ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
अतुल पेठे व राजू इनामदार यांच्या संकल्पनेतून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकरंगमंच रिंगणनाट्याची स्थापना झाली. रिंगणनाट्य हे पथनाट्य नाही पण त्याला पथनाट्याचे भावंड म्हणता येईल.
रिंगणनाट्याचा इतिहास
अतुल पेठे, राजू इनामदार व अश्विन फडके यांनी कार्यकर्त्यांना नाटकाबद्दल प्रशिक्षण देण्यासाठी काही कार्यशाळा घेण्याचे ठरविले. शिराळा-सांगली, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर अशा चार ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या. कार्यशाळांत एकूण २५० कलाकार - कार्येकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट पाडून अंधश्रद्धेचे परिणाम, कारणे, उपाय लिहिण्यास सांगितले गेले. ते लिहिल्यानंतर प्रत्येक गटाने त्याचे सादरीकरण केले. त्यानंतर शब्द कसे स्पष्ट उच्चारावे यासाठी व्यायाम घेण्यात आला. व्यायामानंतर एकेका गटाला नाटकांचे विषय देण्यात आले. प्रत्येक गटाने नाटके लिहिली आणि बसविलीदेखील. शेवटी बसविलेल्या नाटकांची सादरीकरणे झाली. अतुल पेठे व राजू इनामदार यांनी त्या नाटकांना योग्य साच्यात बसविले व मूर्त रूप दिले. या नाटकांना रिंगणनाट्य असे नाव दिले गेले.
(अपूर्ण)