Jump to content

"दिनकर शिलेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुणे येथे राहणारे दिनकर शिलेदार हे एक मराठी लेखक, कवी आणि प्रकाशक...
(काही फरक नाही)

२३:५५, ९ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

पुणे येथे राहणारे दिनकर शिलेदार हे एक मराठी लेखक, कवी आणि प्रकाशक आहेत. दिनमार्क पब्लिकेशन्स ही त्यांची प्रकाशनसंस्था आहे. या संस्थेची स्थापना त्यांनी १९९७च्या दिवाळीत केली. 'मानवाधिकार चळवळ एक मुक्त चिंतन' हे मानवाधिकारावरील मराठीतले पहिले पुस्तक प्रकाशित करुन दिनमार्क पब्लिकेशन्सने प्रकाशन क्षेत्रात एक ठोस पाऊल टाकले. या संस्थेतर्फे इ.स. १९९९पासून ते दरवर्षी ’आपले छंद’ हा संग्राह्य दिवाळी अंक काढतात. या अंकाला १३ वर्षात ३४ पुरस्कार मिळाले आहेत.

शिलेदार यांची स्वतःची मोना अॅडव्हर्टायझिंग नावाची जाहिरात कंपनी आहे. शिवाय ते ’रामा' (रीजनल अॅडव्हर्टायझिंग मार्केटिंग असोसिएशन) या जाहिरातदारांच्या संघटनचे सतत दोन वर्षेे अध्यक्ष होते.

दिनकर शिलेदार यांनी लिहिलेली पुस्तके

  • कोंदण (२०१५)
  • ग्राफिटी ट्रॅफिक अवेअरनेस
  • तृणाकुर (काव्यसंग्रह)
  • दुर्वांकुर (कथासंग्रह)
  • मोरपंखी (२०१५)
  • राजमुद्रा (२०१५)