"हुआंग बाओशेंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: हुआंग बाओशेंग (जन्म: शांघाय, जुलै १९४२) हे चीन देशातील एक संस्कृत व... |
(काही फरक नाही)
|
०१:२४, ९ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
हुआंग बाओशेंग (जन्म: शांघाय, जुलै १९४२) हे चीन देशातील एक संस्कृत व पाली भाषेचे तज्ज्ञ आहेत. आपल्या पाच सहकार्यांसह १० वर्षे खपून महाभारताचे भाषांतर करण्याचे श्रेय हुआंग यांच्या नावावर आहे. तसेच उपनिषदे, बौद्ध ग्रंथ, भगवद्गीता, ललितविस्तारसूत्र व वज्रछेदिका (हीरकसूत्र) आदी ग्रंथांचे त्यांनी चिनी भाषेत भाषांतर केले आहे. संस्कृत व पाली या भाषांतील जगातील श्रेष्ठ संशोधकांपैकी एक अशी त्यांची ख्याती आहे. ज्यांना २००८ साली भारत सरकारने पद्मभूषण देऊन सन्मान केला होता ते चीनचे महान भारतविद्याविशारद जी श्ये लीन यांचा वारसा ते समर्थपणे चालवत आहेत. बाओशेंग हे श्ये लीन यांचेच शिष्य आहेत.
जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि भारतातील आधुनिक विद्वान यांच्या कृतींचा अभ्यास करता यावा, म्हणून श्ये लीन यांनी आपल्याला जर्मन व आधुनिक भारतीय भाषा शिकायला सांगितले होते, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. यावरून त्यांचा अभ्यास किती खोल गेला असावा, याची कल्पना येते.
शिक्षण
हुआंग यांनी पेकिंग विद्यापीठातून इ.स. १९६५ साली संस्कृत आणि पाली हे मुख्य विषय घेऊन पदवी मिळवली. पेकिंग विद्यापीठात अध्यापन करून निवृत्ती घेतलेले हुआंग हे सध्या (इ.स. २०१५) ग्रॅज्युएट स्कूल ऑफ चायनीज अॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सेस (CASS)च्या इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लिटरेचर या संस्थेत संशोधक म्हणून काम करीत आहेत. चीनमधील ’विदेशी वाङ्मय संस्था आणि चीनमधीलच भारतीय साहित्य संशोधन संस्था यांचेे ते अध्यक्ष आहेत.
हुआंग यांनी हाती घेतलेले चीनमधील प्रकल्प
महाभारताचे चिनी भाषेत भाषांतर करण्याचे काम चीनमध्ये १९८९पासून चालू होते. ते काही काळासाठी बंद पडल्यानंतर हुआंग बाओशेंग यांनी ते १९६६ साली परत सुरू केले. अंती इ.स. १९९३ साली महाभारताचे पहिले पर्व प्रकाशित करण्याचा मान हुआंग बाओशेंग यांना मिळाला.
(अपूर्ण))
पुरस्कार
हुआंग बाओशेंग यांनी संस्कृत व पाली भाषेत केलेल्या कामासाठी भारत सरकारने त्यांना २०१५ सालचा पद्मश्री पुरस्कार दिला आहे.