Jump to content

"ॲनेट श्मिएडशेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. अॅनेट श्मिएडशेन (Dr. Annette Schmiedchen) (जन्म : १९६६) या एक जर्मन संस्कृतज्ञ...
(काही फरक नाही)

१६:५१, ८ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

डॉ. अॅनेट श्मिएडशेन (Dr. Annette Schmiedchen) (जन्म : १९६६) या एक जर्मन संस्कृतज्ञ आणि भारतविद्याविशारद आहेत. भारतातील जर्मनीचे कलकत्तास्थित महा वाणिज्य दूत (इ.स.२०१५) रायनर श्मिएडशेन यांच्या त्या पत्‍नी आहेत. त्यामुळे त्यांचे सध्याचे (इ.स. २०१५) वास्तव्य भारतातच आहे. यापूर्वीही म्हणजे इ.स. १९९२पासून त्या संस्कृताधारित अभ्यासासाठी नियमितपणे भारतात येत असत.

डॉ. श्मिएडशेन यांनी भारताचा प्राचीन इतिहास, भारतविद्याशास्त्र आणि संस्कृत शिलालेखाभ्यास (Epigraphy) या विषयांचा अभ्यास जर्मनीच्या बर्लिन येथील हम्बोल्ट (Humboldt) विद्यापीठातून केला. इ.स. १९९४ साली त्यांना ’उत्तर हिंदुस्थानातल्या बौद्ध मठांना इसवी सनाच्या ५व्या ते ८व्या शतकांत देणगीरूपात मिळत असलेली गावे, जमिनी आणि वित्त’ या विषयावर लिहिलेल्या प्रबंधासाठी या विद्यापीठाची पीएच.डी. मिळाली

इ.स. २००९ मध्ये डॉ. अॅनेट श्मिएडशेन यांना त्यांच्या ’पूर्व मध्ययुगीन महाराष्ट्रामधील शिलालेखीय संस्कृती आणि तत्कालीन प्रादेशिक परंपरा’ आणि ’८व्या ते १३व्या शतकातील राष्ट्रकूट, शिलाहार आणि यादवांच्या काळात धार्मिक संस्थांना अधिकृतपणे प्रदान होत असलेल्या राजकीय सत्ता व राजाश्रय’ या विषयावरील प्रबंधाला हॅले येथील मार्टिन ल्य़ुथर विद्यापीठाडून योग्यतानिदर्शक पदवी (Habilitation degree) देण्यात आली.

डॉ. अॅनेट श्मिएडशेन या आंतरराष्ट्रीय संस्कृत अभ्यास संघटनेच्या मानद संशोधक अधिछात्र व मार्टिन ल्युथर विद्यापीठात भारतविद्याशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. सध्या हम्बोल्ट विद्यापीठात ’मध्ययुगीन धार्मिक प्रतिष्ठाने आणि त्यांना मिळणार्‍या देणग्या’ या विषयावर त्या एका आंतर-सांस्कृतिक संशोधनप्रकल्पावर काम करील आहेत. (इ.स. २०१५). या कामासाठी त्यांना युरोपीय संशोधन मंडळाने आर्थिक अनुदान दिले आहे.

पुरस्कार

संस्कृत भाषेच्या आणि भारतविद्याशास्त्राच्या क्षेत्रांत केलेल्या कार्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींकडून डॉ. अॅनेट श्मिएडशेन यांना २६ जानेवारी २०१५ या दिवशी पद्मश्री प्रदान करण्यात आली.