Jump to content

"के.के. वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
काकासाहेबांची देहयष्टी सहा फूट उंच होती. भरदार छाती व आवाजात जरब असल्याने त्यांचे व्यक्तिमत्व कमालीचे प्रभावशाली होते. आवाज पहाडी होता. बहुजन समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनावर आणि शोषणकर्त्यांवर कर्मवीर काका आपल्या निर्भीड कर्तृत्वाची आणि पहाडी आवाजाची तोफ डागत असत. शोषितांच्या बाजूने उभे राहताना काकांनी पक्ष शिस्तीची, स्वतःच्या स्वाभिमानाची अथवा प्रतिष्ठेची कधीही पर्वा केली नाही. राजकीय पुढार्‍यांच्या रागलोभाची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही. जनतेचे प्रश्न पक्षाकडून सुटत नसतील, तुम्हाला न भिता बोलायची मुभा नसेल तर तो पक्ष काय कामाचा, असे त्यांचे रोखठोक मत होते. पक्ष हे त्यांचे साध्य नसून साधन होते. त्यामुळे काकांनी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, कामगार किसान पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, पुन्हा काँग्रेस व भारतीय क्रांती दल असे प्रसंगानुरूप पक्षांतर केले. त्यापायी त्यांना अनेक वेळा अपयशही पत्करावे लागले, तरीसुद्धा काकांनी स्वतःच्या हिंमतीवर, कर्तबगारीने जनसेवा केलीच; सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी राजकीय पक्ष व सत्ता गौण मानून सहकार, शिक्षण शेती व बहुजनांच्या विकासासाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावले.

==बांधकाम व्यवसाय==
काकांचे कुटुंब तसे मोठे. वडिलांचे कृपाछत्र त्यांना दीर्घकाळ लाभले. काकांचा विवाह १४ व्या वर्षीच झाला. काका मॅट्रिक पास झाले. पुढील शिक्षण न घेता त्यांनी कॉन्ट्रॅक्टरचा धंदा सुरू केला त्यांच्यामध्ये धंद्यामध्ये चिकाटी
असल्यामुळे त्यांनी धंद्यात जम बसविला. या कामात काकांना भरपूर पैसाही मिळाला. बांधकाम खात्याच्या नियमांचा अभ्यास करून सरकारी कामाचा दर्जा उत्तम राखून एक नवा नावलौकिक मिळवला. कामाच्या गुणवत्तेबाबत आपल्या व्यवसायात त्यांनी कधीच तडजोड केली नाही.

==एक रुपया किंमतीची नाशिक नगरपालिकेची इमारत==
१९३५ साली नाशिक नगरपालिकेच्या इमारतीच्या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन १९३७ मध्ये त्यांनी ते पूर्ण केले. अंदाजपत्र व करारनाम्यात डी-वॉटरिंगचा स्पष्ट उल्लेख नसल्याने काकांना या कामात मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. तशाही परिस्थीतीत त्यांनी काम पूर्ण केले. परंतु, नगरपालिकेच्या तत्कालीन अधिकार्‍यांनी काकांच्या बिलाबद्दल दंडात्मक कारवाईचा वापर करून पूर्ण इमारतीच्या बांधकामाच्या बिलापेक्षाही ज्यादा दंडाची आकारणी केली.

एकाही नगरसेवकाने काकांच्या आर्थिक नुकसानाची पर्वा केली नाही. अशा बिकट परिस्थितीत सुध्दा काकांनी स्वतःचा बाणेदारपणा सोडला नाही. भरसभेत त्यांनी एकच विनंती केली. इमारतीचा एकूण खर्च एक रुपया दाखवावा व तसा उल्लेख इमारतीवर करावा व त्यानुसार एक रुपयाच्या व्हाऊचरवर काकांनी सही करून दिली. आजही नाशिकच्या मेनरोडवरील नगरपालिकेच्या इमारतीवर काकांचे नाव व इमारतीची किंमत एक रुपया लिहिलेली आहे.

(अपूर्ण)
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]

२३:०८, ६ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

के.के. ऊर्फ कर्मवीर काकासाहेब वाघ (जन्म : २६ ऑक्टोबर १८९८; मृत्यू : नाशिक, २२ जुलै १९७३) हे एक राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्ते होते.

कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे व्यक्तिमत्त्व

काकासाहेबांची देहयष्टी सहा फूट उंच होती. भरदार छाती व आवाजात जरब असल्याने त्यांचे व्यक्तिमत्व कमालीचे प्रभावशाली होते. आवाज पहाडी होता. बहुजन समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनावर आणि शोषणकर्त्यांवर कर्मवीर काका आपल्या निर्भीड कर्तृत्वाची आणि पहाडी आवाजाची तोफ डागत असत. शोषितांच्या बाजूने उभे राहताना काकांनी पक्ष शिस्तीची, स्वतःच्या स्वाभिमानाची अथवा प्रतिष्ठेची कधीही पर्वा केली नाही. राजकीय पुढार्‍यांच्या रागलोभाची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही. जनतेचे प्रश्न पक्षाकडून सुटत नसतील, तुम्हाला न भिता बोलायची मुभा नसेल तर तो पक्ष काय कामाचा, असे त्यांचे रोखठोक मत होते. पक्ष हे त्यांचे साध्य नसून साधन होते. त्यामुळे काकांनी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, कामगार किसान पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, पुन्हा काँग्रेस व भारतीय क्रांती दल असे प्रसंगानुरूप पक्षांतर केले. त्यापायी त्यांना अनेक वेळा अपयशही पत्करावे लागले, तरीसुद्धा काकांनी स्वतःच्या हिंमतीवर, कर्तबगारीने जनसेवा केलीच; सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी राजकीय पक्ष व सत्ता गौण मानून सहकार, शिक्षण शेती व बहुजनांच्या विकासासाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावले.

बांधकाम व्यवसाय

काकांचे कुटुंब तसे मोठे. वडिलांचे कृपाछत्र त्यांना दीर्घकाळ लाभले. काकांचा विवाह १४ व्या वर्षीच झाला. काका मॅट्रिक पास झाले. पुढील शिक्षण न घेता त्यांनी कॉन्ट्रॅक्टरचा धंदा सुरू केला त्यांच्यामध्ये धंद्यामध्ये चिकाटी असल्यामुळे त्यांनी धंद्यात जम बसविला. या कामात काकांना भरपूर पैसाही मिळाला. बांधकाम खात्याच्या नियमांचा अभ्यास करून सरकारी कामाचा दर्जा उत्तम राखून एक नवा नावलौकिक मिळवला. कामाच्या गुणवत्तेबाबत आपल्या व्यवसायात त्यांनी कधीच तडजोड केली नाही.

एक रुपया किंमतीची नाशिक नगरपालिकेची इमारत