"सतीश नाईक (चित्रकार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: चित्रकार सतीश नाईक (जनम : ५ एप्रिल १९५५) यांनीे जे.जे स्कूल ऑफ आर्ट... |
(काही फरक नाही)
|
१९:२९, ४ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
चित्रकार सतीश नाईक (जनम : ५ एप्रिल १९५५) यांनीे जे.जे स्कूल ऑफ आर्टमधून फाइन आर्ट्स व इंटीरियर डिझाइनचा अभ्यास पूर्ण केला व पदविका मिळवली.
सतीश नाईक यांची चित्रकारिता वैशिष्ट्यपूर्ण आहे. अमूर्त चित्रकला विचारपूर्वक अभ्यासत असताना स्वत:ची स्वतंत्र शैली त्यांनी विकसित केली. पॉल क्लीच्याच दृक् प्रभावातील भारतीय चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रकलेने झपाटून गेल्यामुळे सतीश नाईक यांनीे २००७ साली गायतोंडे यांच्यावरील ‘चिन्ह’चा खास अंक प्रकाशित करून दृश्यकलेच्या अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाचे काम करून ठेवले आहे.
पत्रकार सतीश नाईक
नोकरीमुळे महिन्याची आर्थिक विवंचना दूर होण्याच्या दृष्टीने सतीश नाईक यांनीपत्रकार होण्याचा मार्ग पत्करला. त्याने ‘लोकप्रभे’त उपसंपादक, प्रमुख उपसंपादक, ‘चित्ररंग’मध्ये उपसंपादक, ‘वेध’चा संपादक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्याने कलाकिर्द नावाची कलाकारसूचीदेखील संपादित केली आहे. त्याचे वृत्तपत्रांतील विविध विषयांवरील लेखन परखड असते.
{अपूर्ण)