"रावसाहेब शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे (जन्म : पाडळी (सिन्नर तालुका), १० जून १९... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे (जन्म : पाडळी (सिन्नर तालुका), १० जून १९२८; मृत्यू : श्रीरामपूर, २६ जानेवारी, २०१५) हे मानवतेवर विश्वास ठेवणारे, जातीपातीला थारा न देणारे आणि शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठा नावलौकिक असलेले एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष होते. भारताचे माजी मंत्री कै. अण्णासाहेब शिंदे हे रावसाहेबांचे ज्येष्ठ बंधू होत. |
अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे (जन्म : पाडळी (सिन्नर तालुका), १० जून १९२८; मृत्यू : श्रीरामपूर, २६ जानेवारी, २०१५) हे मानवतेवर विश्वास ठेवणारे, जातीपातीला थारा न देणारे आणि शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठा नावलौकिक असलेले एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष होते. भारताचे माजी मंत्री कै. अण्णासाहेब शिंदे हे रावसाहेबांचे ज्येष्ठ बंधू होत. |
||
रावसाहेब शिंदे यांनी पाडळी व देवठाण (नाशिक) येथे प्राथमिक शालेय शिक्षण घेतले. त्यांचे माध्यमिक शिक्षण सिन्नर व नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व संगमनेरच्या पेटिट विद्यालयात झाले. नगर, कोल्हापूर व पुणे येथे त्यांचे महाविद्यालयीन व विधी शिक्षण झाले. ते बी.ए. एलएल.बी. होते. |
|||
⚫ | |||
ते कॉलेजात असतानाच भारतीय स्वातंत्र्य चळवळ जोरात सुरू होती. ‘करेंगे या मरेंगे’ आंदोलनात त्यांनी भाग घेतला. नाशिकला राष्ट्रसेवा दलात काम करताना गुप्त बैठका आयोजित करणे, प्रभात फेऱ्या व मोर्चे काढणे, रस्ते अडविणे, पूल तोडणे, तारा तोडणे अशा भूमिगत चळवळीत ते सक्रिय होते. मोठे बंधू व माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री (कै.) अण्णासाहेब शिंदेंसह सर्व शिंदे परिवार स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाल्याने ब्रिटिशांनी त्यांचे पाटील वतन रद्द केले. मात्र या परिवाराचे कार्य थांबले नाही. |
|||
स्वातंत्र्यानंतर देशात स्वकीयांचे राज्य आले. मात्र शेतकरी, आदिवासी व गरीब जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचे प्रकार वाढू लागले. सावकारशाहीच्या विळख्यात अडकलेल्या जनतेला मुक्त करण्यासाठी रावसाहेबांनी सत्ताधारी स्वकीयांच्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटले. साम्यवादी चळवळ व किसान सभेच्या माध्यमातून शेतकरी, आदिवासींच्या संघटना तयार केल्या. शेतकर्यांच्या जमिनी गिळंकृत करणार्या दस्तावेजांची होळी व सरकारी गोदामे फोडून गरिबांना धान्यवाटप अशी आंदोलने केली. त्यामुळे रावसाहेबांना फरारी घोषित करून त्यांना पकडून देणार्यास दहा हजारांचे बक्षीस जाहीर झाले होते. १९४५ ते १९५१ पर्यंतच्या या काळातील त्यांचे कार्य दीनदलितांना व गरिबांना न्याय देऊन गेले. |
|||
⚫ | शेतमजूर, आदिवासी यांच्या अन्यायाविरोधात लढा उभारणारे शिंदे हे निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध होते. ते श्रीरामपूर बार असोसिएशनचे १५ वर्षे अध्यक्ष होते. पुणे येथील इंडियन लॉ सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी काही काळ सांभाळले. वकिलीखेरीज त्यांनी शेती, पाणीप्रश्न, दुग्ध व्यवसाय, सहकार, सामाजिक उपक्रम, शिक्षण व लेखनासह अनेक क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. |
||
समाजजीवनाच्या बहुतांश विषयांत रस घेऊन उत्तुंग कार्य उभे करणारे अॅड. शिंदे शेवटपर्यंत उत्साहाने कार्यरत होते. वकिली व्यवसायाच्या माध्यमातून सामान्यांना न्याय मिळवून देत नवनवे प्रयोग राबवून रावसाहेबांनी शेतीविकासाचा आदर्श उभा केला होता. साहित्य-संस्कृतीच्या माध्यमातून रसिकतेचे दर्शन घडवितानाच रयत शिक्षण संस्थेच्या द्वारे गरीब मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोचविण्याचे महत्कार्य त्यांनी केले. निर्भीड व अभ्यासू वक्ता, अशी ख्याती असलेल्या रावसाहेबांनी राज्यात व देशाच्या विविध भागांत फिरताना सामाजिक कार्याचा जोमाने प्रसार केला. |
२३:३६, ३१ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे (जन्म : पाडळी (सिन्नर तालुका), १० जून १९२८; मृत्यू : श्रीरामपूर, २६ जानेवारी, २०१५) हे मानवतेवर विश्वास ठेवणारे, जातीपातीला थारा न देणारे आणि शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठा नावलौकिक असलेले एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष होते. भारताचे माजी मंत्री कै. अण्णासाहेब शिंदे हे रावसाहेबांचे ज्येष्ठ बंधू होत.
रावसाहेब शिंदे यांनी पाडळी व देवठाण (नाशिक) येथे प्राथमिक शालेय शिक्षण घेतले. त्यांचे माध्यमिक शिक्षण सिन्नर व नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व संगमनेरच्या पेटिट विद्यालयात झाले. नगर, कोल्हापूर व पुणे येथे त्यांचे महाविद्यालयीन व विधी शिक्षण झाले. ते बी.ए. एलएल.बी. होते.
ते कॉलेजात असतानाच भारतीय स्वातंत्र्य चळवळ जोरात सुरू होती. ‘करेंगे या मरेंगे’ आंदोलनात त्यांनी भाग घेतला. नाशिकला राष्ट्रसेवा दलात काम करताना गुप्त बैठका आयोजित करणे, प्रभात फेऱ्या व मोर्चे काढणे, रस्ते अडविणे, पूल तोडणे, तारा तोडणे अशा भूमिगत चळवळीत ते सक्रिय होते. मोठे बंधू व माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री (कै.) अण्णासाहेब शिंदेंसह सर्व शिंदे परिवार स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाल्याने ब्रिटिशांनी त्यांचे पाटील वतन रद्द केले. मात्र या परिवाराचे कार्य थांबले नाही.
स्वातंत्र्यानंतर देशात स्वकीयांचे राज्य आले. मात्र शेतकरी, आदिवासी व गरीब जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचे प्रकार वाढू लागले. सावकारशाहीच्या विळख्यात अडकलेल्या जनतेला मुक्त करण्यासाठी रावसाहेबांनी सत्ताधारी स्वकीयांच्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटले. साम्यवादी चळवळ व किसान सभेच्या माध्यमातून शेतकरी, आदिवासींच्या संघटना तयार केल्या. शेतकर्यांच्या जमिनी गिळंकृत करणार्या दस्तावेजांची होळी व सरकारी गोदामे फोडून गरिबांना धान्यवाटप अशी आंदोलने केली. त्यामुळे रावसाहेबांना फरारी घोषित करून त्यांना पकडून देणार्यास दहा हजारांचे बक्षीस जाहीर झाले होते. १९४५ ते १९५१ पर्यंतच्या या काळातील त्यांचे कार्य दीनदलितांना व गरिबांना न्याय देऊन गेले.
शेतमजूर, आदिवासी यांच्या अन्यायाविरोधात लढा उभारणारे शिंदे हे निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध होते. ते श्रीरामपूर बार असोसिएशनचे १५ वर्षे अध्यक्ष होते. पुणे येथील इंडियन लॉ सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी काही काळ सांभाळले. वकिलीखेरीज त्यांनी शेती, पाणीप्रश्न, दुग्ध व्यवसाय, सहकार, सामाजिक उपक्रम, शिक्षण व लेखनासह अनेक क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविला.
समाजजीवनाच्या बहुतांश विषयांत रस घेऊन उत्तुंग कार्य उभे करणारे अॅड. शिंदे शेवटपर्यंत उत्साहाने कार्यरत होते. वकिली व्यवसायाच्या माध्यमातून सामान्यांना न्याय मिळवून देत नवनवे प्रयोग राबवून रावसाहेबांनी शेतीविकासाचा आदर्श उभा केला होता. साहित्य-संस्कृतीच्या माध्यमातून रसिकतेचे दर्शन घडवितानाच रयत शिक्षण संस्थेच्या द्वारे गरीब मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोचविण्याचे महत्कार्य त्यांनी केले. निर्भीड व अभ्यासू वक्ता, अशी ख्याती असलेल्या रावसाहेबांनी राज्यात व देशाच्या विविध भागांत फिरताना सामाजिक कार्याचा जोमाने प्रसार केला.