"रावसाहेब शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे (जन्म : पाडळी (सिन्नर तालुका), १० जून १९... |
(काही फरक नाही)
|
२३:२६, ३१ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे (जन्म : पाडळी (सिन्नर तालुका), १० जून १९२८; मृत्यू : श्रीरामपूर, २६ जानेवारी, २०१५) हे मानवतेवर विश्वास ठेवणारे, जातीपातीला थारा न देणारे आणि शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठा नावलौकिक असलेले एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष होते. भारताचे माजी मंत्री कै. अण्णासाहेब शिंदे हे रावसाहेबांचे ज्येष्ठ बंधू होत.
रावसाहेब शिंदे यांनी बी.ए. एलएल.बी. पर्यंतचे शिक्षण घेतले होते होते. शेतमजूर, आदिवासी यांच्या अन्यायाविरोधात लढा उभारणारे शिंदे हे निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध होते. श्रीरामपूर बार असोसिएशनचे १५ वर्षे अध्यक्ष होते. पुणे येथील इंडियन लॉ सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी काही काळ सांभाळले. वकिलीखेरीज त्यांनी शेती, पाणीप्रश्न, दुग्ध व्यवसाय, सहकार, सामाजिक उपक्रम, शिक्षण व लेखनासह अनेक क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविला.