"बेबी शकुंतला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बेबी शकुंतला (जन्म : १७ नोव्हेंबर १९३२; मृत्यू : १८ जानेवारी २०१५) ह...
(काही फरक नाही)

२३:३४, १९ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

बेबी शकुंतला (जन्म : १७ नोव्हेंबर १९३२; मृत्यू : १८ जानेवारी २०१५) ही एकेकाळी मराठी चित्रपटांत काम करणारी आघाडीची अभिनेत्री होती. त्यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचे नाव उमा नाडगोंडे.

प्रभात फिल्म कंपनीच्या ‘दहा वाजता’ या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़. त्यांनी आपल्या आयुष्यात ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

बेबी शकुंतला यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी पाटील, बिमल रॉय आणि बी. आर. चोप्रा यांच्यासारख्या नामवंत दिग्दशर्कांच्या हाताखाली काम केले आहे.

बेबी शकुंतला यांची भूमिका असलेले चित्रपट

  • अखेर जमलं
  • अबोली
  • कमल के फूल (हिंदी)
  • चिमणी पाखरे
  • छत्रपती शिवाजी
  • झमेला (हिंदी)
  • तारामती
  • दहा वाजता
  • नन्हे-मुन्ने (हिंदी)
  • परदेस (हिंदी)
  • फ़रेब (हिंदी)
  • भाग्यवान
  • मायबहिणी
  • मायाबाजार
  • मी दारू सोडली
  • रामशास्त्री
  • लहरें (हिंदी)
  • शारदा
  • सपना (हिंदी)
  • सौभाग्य


(अपूर्ण)