Jump to content

"विजय यंगलवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. विजय गोविंदराव यंगलवार (जन्म : भंगारम तळोधी-चंद्रपूर जिल्हा...
(काही फरक नाही)

००:२८, १७ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

प्रा. विजय गोविंदराव यंगलवार (जन्म : भंगारम तळोधी-चंद्रपूर जिल्हा, ८ एप्रिल १९५३) हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी काही थोर पुरुषांची चरित्रे, आणि या शिवाय काही तीर्थक्षेत्रांची ओळख करून देणारी पुस्तकेही लिहिली आहेत. ते एम.एस्‌सी.(इलेक्ट्रॉनिक्स), एल्‌एल.बी. एल्‌एम्‌आय्‌एस्‌टीई आहेत. ते जर्मन भाषा शिकले आहेत. संगणकशास्त्राचे काही अभ्यासक्रमही त्यांनी केले आहेत.

नोकरी

चंद्रपूरमध्ये ते १९७५-७६ या काळात शाळाशिक्षक होते. १९७६-९५ या काळात सरकारी पॉलिटेक्निकमध्ये इलेकट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या विषयाचे त्यांनी अध्यापन केले. पुढे ते त्या विद्याशाखेचे ते त्याच संस्थेमध्ये प्रमुख झाले.

सामाजिक कार्य आणि लेखन

सामाजिक कार्याची आवड असल्याने ते अनेक संघटनांचे पदाधिकारी झाले.

प्रा. विजय यंगलवार यांनी इलेक्ट्रॉनिक्स पदविका अभ्यासक्रमावर आधारित इलेक्ट्रॉनिक्स विषयाची २५हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. विविध वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांतून त्यांनी लेख लिहिले आहेत. तांत्रिक विषयाचे प्राध्यापक असूनही त्यांनी अनेक धार्मिक विषयांवरही लिहिले आहे.

विजय यंगलवार यांनी लिहिलेली पुस्तके

  • आधुनिक काळातील संतांची मांदियाळी
  • श्री क्षेत्र कन्याकुमारी दर्शन
  • श्री गणेश माहात्म्य
  • गो माहात्म्य सांगणारी गो - सूक्ते
  • देवस्वरूपा कामधेनु (वैज्ञानिक)
  • राष्ट्र नेते नरेंद्र मोदी
  • नागपूर दर्शन
  • पंचगव्य औषधोपचार
  • पद्मशाली यशोगाथा
  • पंथ प्रदर्शक संत
  • वायुकन्या पी. टी. उषा
  • श्री क्षेत्र पैठण दर्शन
  • भारतीय ऑलिम्पिक वीर
  • भारतीय नोबेल विजेते
  • भारताची राष्ट्रीय प्रतीके
  • महर्षी अभियंता - मो.(क्षगुंडम) विश्वेश्वरैय्या
  • महिला संत
  • श्री क्षेत्र मार्कण्ड देव
  • मोक्षप्राप्ती
  • श्री क्षेत्र शेगाव दर्शन
  • Basic Electronics for First Year Diploma (लेखक : यंगलवार आणि तीन सहलेखक)