Jump to content

"संयोगिता पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कोल्हापूरच्या राहणार्‍या संयोगिता पाटील (जन्म : १५ ऑगस्ट १९८७) या...
(काही फरक नाही)

१५:०८, १५ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

कोल्हापूरच्या राहणार्‍या संयोगिता पाटील (जन्म : १५ ऑगस्ट १९८७) या एक मराठी भरतनाट्यम नर्तिका आहेत. त्यांच्या आईचे नाव शोभा पाटील. संयोगिताच्या जन्मानंतर काही महिन्यातच त्या पतीपासून विभक्त झाल्या. त्यांना स्वतःला नृत्य शिकण्याची खूप आवड होती, पण ते न जमल्यामुळे त्यांनी सर्व लक्ष संयोगितावर केंद्रित केले. आर्थिक विवंचना असूनही अतिशय कष्टाने शोभा पाटील यांनी संयोगिताला एक उत्कृष्ट नर्तिका बनवले.

वयाच्या बाराव्या वर्षी संयोगिता पाटील यांनी आईच्या आग्रहाखातर एकाच वेळी शास्त्रीय गायन, कथ्थक आणि भरतनाट्यम शिकण्यास प्रारंभ केला; मात्र दोन वर्षांनंतर त्यांनी भरतनाट्यम्‌वर लक्ष केंद्रित केले. त्यांनी भरतनाट्यमचे शिक्षण अमृता जांबोलीकर, पंडित टी.रविंद्र शर्मा आणि डॉ. संध्या पुरेचा यांच्याकडून घेतले.

संयोगिता पाटील यांच्याकडे मानसशास्त्रातील पदवी आहे. त्यांनी भरतनाट्यम हा विषय घेऊन एम.ए. केले आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची नृत्य अलंकार ही पदवीही आहे. इतके असूनही त्या सध्या (२०१५ साली) एम.बी.ए.करीत आहेत.

संयोगिता पातील या ’तपस्यानिधी कला अॅकॅडमी’ व ’शिवालय नृत्य मंदिर’ या नय्त्य शिक्षण देणार्‍या संस्थांच्या संचालक आहेत.

संयोगिता पाटील यांचे नृत्याचे काही खास सार्वजनिक कार्यक्रम

  • दहावीच्या वर्गात असताना संयोगिता पाटील यांनी सार्वजनिक ठिकाणी पहिला कार्यक्रम सादर केला. त्यानंतर अनेक स्पर्धा गाजवल्या व विविध महोत्सवांतून आपल्या पदन्यासाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
  • अमेरिकेतील न्यू जर्सी येथे विश्व मराठी नाट्यसंमेलनातील कार्यक्रम
  • तमिळनाडूतील चिदंबरम येथील नटराज मंदिरातील कार्यक्रम
  • कोल्हापुरातील महालक्ष्मी नवरात्रोत्सवात सहभाग
  • गोव्यातील कला अॅकॅडमीत झालेला कार्यक्रम
  • विजयदुर्ग महोत्सव, विजयदुर्ग.
  • डॉंबिवली, बीड, रत्‍नागिरी येथील अखिल भारतीत नाट्य संमेलनांत झालेले कार्यक्रम
  • जयसिंगपूर आणि शिरोळ येथी शाहू महोत्सवात
  • कोल्हापूरच्या दसरा महोत्सवात
  • कोल्हापूरच्या रंकाळा महोत्सवात
  • दिल्ली, गुजराथ, कर्नाटक राज्यांत आणि राजस्थानातील माउंट अबू येथील कार्यक्रमांत

विक्रम

  • कोल्हापुरात सतत १३ तासाचा भरतनाट्यमचा एकल नृत्याविष्कार (२९ जुलै २००४)
  • कोल्हापुरात सतत ६६ तास एकल नृत्याचा कार्यक्रम (४ ते ७ डिसेंबर २००८)
  • एकाच कार्यक्रमात २१०० नर्तिकांना घेऊन १२ मिनिटांचा कार्यक्रम.




(अपूर्ण)