"गांधर्व महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ २२: | ओळ २२: | ||
याशिवाय मिरज येथील वाद्यनिर्मात्या कलावंतांचा एक मेळावाही घेतला गेला आहे. त्यातून एक नवी कल्पना पुढे आली की या कलावंतांना मंडळाच्या खर्चाने गावोगाव पाठवून ठिकठिकाणचे तंबोरे-तंतुवाद्ये दुरुस्त करून देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. |
याशिवाय मिरज येथील वाद्यनिर्मात्या कलावंतांचा एक मेळावाही घेतला गेला आहे. त्यातून एक नवी कल्पना पुढे आली की या कलावंतांना मंडळाच्या खर्चाने गावोगाव पाठवून ठिकठिकाणचे तंबोरे-तंतुवाद्ये दुरुस्त करून देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. |
||
==शाखा== |
|||
==अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या शाखा== |
|||
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या भारतातील २१ राज्यांत शाखा आहेत. त्या अश्या : |
|||
* आंध्र प्रदेश १४ शाखा |
|||
* आसाम २५ शाखा |
|||
* उत्तर प्रदेश ३० |
|||
* उत्तरांचल ३ |
|||
* ओरिसा ४७ |
|||
* कर्नाटक ४० |
|||
* केरळ ११ |
|||
* गुजराथ १०९ |
|||
* उत्तर गुजराथ (सौराष्ट्र-कच्छ) ८ |
|||
* गोवा |
|||
* छत्तीसगड १२ |
|||
* जम्मू-काश्मीर २ |
|||
* झारखंड ७ |
|||
* दीव-दमण १ |
|||
* तामिळनाडू १ |
|||
* दिल्ली ११ |
|||
* पंजाब २ |
|||
* पश्चिम बंगाल ० |
|||
* बिहार ४ |
|||
* मध्य प्रदेश ३२ |
|||
* महाराष्ट्र ३८४ |
|||
* राजस्थान २५ |
|||
* हरियाणा ६ |
|||
==परदेशी शाखा== |
|||
* अमेरिका ११ |
|||
* इंग्लंड २ |
|||
* दुबई १ |
|||
* मस्कत १ |
|||
==महाराष्ट्रातील शाखा== |
|||
* [[विनायकबुवा पटवर्धन]] यांनी पुण्यात ८ मे, इ.स. १९३२ रोजी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. |
* [[विनायकबुवा पटवर्धन]] यांनी पुण्यात ८ मे, इ.स. १९३२ रोजी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. |
||
* मिरजेमध्ये एक शाखा आहे. |
* मिरजेमध्ये एक शाखा आहे. |
१४:१७, ३ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय ही भारतीय संगीत शिकविणारी एक प्रख्यात संस्था आहे. हिच्या शाखा भारतातील अनेक शहरांमध्ये आहेत.
अनेक घराण्यांचे मिळून एक 'हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत' आहे, याची जाणीवही कमीच असलेल्या काळात पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी संगीतशिक्षण ही अन्य विद्यापीठीय शिक्षणासारखीच अभ्यास करण्याची, परीक्षा घेता येईल अशी गोष्ट आहे, असा शास्त्रीय विचार केला आणि तडीस नेला.
गांधर्व महाविद्यालयाची स्थापना
एक काळ असा होता की एकूणच शिक्षणाच्या बाबतीत आजच्या इतक्या सोयी, सुविधा-सवलती मुळीच नव्हत्या. संगीताच्या बाबतीत तर यापेक्षाही फार वाईट परिस्थिती होती. त्या काळात कलाकार मोठे; पण समजा एखाद्याला विचारले की, 'आपके गाने में वो सरगम क्या होता है?' तर साधी माहिती मिळणेही मुश्किल होते. उलट 'बहोत मुश्किल है, सिर्फ एक जनम में नहीं आती, और हमारे शागीर्द बनने बगैर कुछ नहीं मिलेगा, कुछ नहीं समझेगा' असलीच काहीतरी उर्मट उत्तरे मिळण्याचा तो काळ होता. अशा त्या काळात दक्षिण महाराष्ट्रातल्या मिरज या संस्थानी गावातल्या एका २९ वर्षे वयाच्या पंडित विष्णू दिगंबर पलुसकर नावाच्या एका तरुणाने भारताच्या अखंड पंजाबातल्या लाहोर नावाच्या शहरात, ५ मे १९०१ रोजी 'गांधर्व महाविद्यालय' या नावाची एक संस्था स्थापन केली. ज्या काळात कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी या शब्दांची देशी भाषांमध्ये भाषांतरेही झाली नव्हती त्या काळात पं. पलुसकरांनी संस्थेच्या नावातच 'महाविद्यालय' हा शब्द स्वतंत्रपणे योजला आहे.
पुढे पंडितजींच्या शिष्य-प्र-शिष्यांनी देशात ठिकठिकाणी गांधर्व महाविद्यालयाच्या शाखा स्थापन केल्या.
संगीत विद्यापीठ
पं विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या निधनानंतर लगेचच त्यांच्या शिष्यांनी याच संगीतप्रचार प्रसार कार्यासाठी गांधर्व महाविद्यालय मंडळ स्थापन केले. त्याचेच आजचे रूप म्हणजे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ. २०१२ सालच्या डिसेंबरात 'गांधर्व महाविद्यालय मंडळा'च्या स्थापनेला एक्क्याऐंशी वर्षे पूर्ण झाली, आणि या संस्थेचे एका विद्यापीठामध्ये रूपांतर झाले.
परीक्षा, पुस्तके
संगीत शिकायचे, तर त्यासाठी लिखित स्वरूपात काही असायला हवे, म्हणून परीक्षा घ्याव्यात, असे विष्णु दिगंबरांना वाटले. त्यांनी त्यासाठीची पाठ्यपुस्तके तयार करून घेतली. अभ्यासक्रम निश्चित केले आणि अध्यापकांची एक फौजच तयार केली. लाहोर, कराचीपासून दिल्ली, मुंबई पुण्यापर्यंत सर्वत्र या संगीत महाविद्यालयांचा शाखाविस्तार झाला आणि संगीत ही अप्राप्य गोष्ट राहिली नाही.
प्रत्यक्ष शिक्षण
केवळ लिखित स्वरूपात संगीत शिकण्यापेक्षाही प्रत्यक्ष संगीत शिकण्याला संगीत शिक्षणात फार महत्त्व असतं. त्यामुळे रियाज करण्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान देण्यासाठी कलाशिक्षणातील बुजुर्ग, अनुभवी कलावंत-विद्वानांचे प्रात्यक्षिक शैक्षणिक विचार, शिक्षक-विद्यार्थ्यांना मिळणारा वेळ, त्यात शक्य असणारे शिक्षण-रियाज आणि त्यातून संगीताचा आनंद मिळवून देणे, हे काम गांधर्व महाविद्यालये मोठ्या प्रमाणावर करत असतात.
कलावंतांचे संंमेलन
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या कार्यकारिणीने आत्तापर्यंत अनेक संगीत प्रवीण किंवा संगीताचार्य (पीएच.डी) झालेल्या कलावंतांची संमेलने घेतली आहेत.
याशिवाय मिरज येथील वाद्यनिर्मात्या कलावंतांचा एक मेळावाही घेतला गेला आहे. त्यातून एक नवी कल्पना पुढे आली की या कलावंतांना मंडळाच्या खर्चाने गावोगाव पाठवून ठिकठिकाणचे तंबोरे-तंतुवाद्ये दुरुस्त करून देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे.
शाखा
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या भारतातील २१ राज्यांत शाखा आहेत. त्या अश्या :
- आंध्र प्रदेश १४ शाखा
- आसाम २५ शाखा
- उत्तर प्रदेश ३०
- उत्तरांचल ३
- ओरिसा ४७
- कर्नाटक ४०
- केरळ ११
- गुजराथ १०९
- उत्तर गुजराथ (सौराष्ट्र-कच्छ) ८
- गोवा
- छत्तीसगड १२
- जम्मू-काश्मीर २
- झारखंड ७
- दीव-दमण १
- तामिळनाडू १
- दिल्ली ११
- पंजाब २
- पश्चिम बंगाल ०
- बिहार ४
- मध्य प्रदेश ३२
- महाराष्ट्र ३८४
- राजस्थान २५
- हरियाणा ६
परदेशी शाखा
- अमेरिका ११
- इंग्लंड २
- दुबई १
- मस्कत १
महाराष्ट्रातील शाखा
- विनायकबुवा पटवर्धन यांनी पुण्यात ८ मे, इ.स. १९३२ रोजी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
- मिरजेमध्ये एक शाखा आहे.
- नव्या मुंबईतील वाशी येथील शाखेत एक म्युझिक रिसर्च सेन्टरची स्थापना झाली आहे. संगीताच्या शिक्षण पद्धतीचे आणि एकूणच संगीतातील प्रात्यक्षिक विषयांचे संशोधन ही या मागील मुख्य दृष्टी असून, त्यासाठी व्याख्याने, चर्चासत्रे होतात.. त्याबरोबरच या उपक्रमाद्वारे शिक्षकांना उपयोगी दृक्-श्राव्य साहित्य संशोधित व संग्रहित करण्याचे कार्य चालते.
संगीत महाविद्यालयांमध्ये शिकविले जाणारे विषय
- कंठसंगीत
- वाद्यसंगीत
- नृत्य
- संगीत विद्यालय व्यवस्थापन
- शिक्षकांच्या रियाजासाठी मार्गदर्शन