"गांधर्व महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय ही भारतीय संगीत शिकविणारी एक प्... |
(काही फरक नाही)
|
१३:२०, ३ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय ही भारतीय संगीत शिकविणारी एक प्रख्यात संस्था आहे. हिच्या शाखा भारतातील अनेक शहरांमध्ये आहेत.
अनेक घराण्यांचे मिळून एक 'हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत' आहे, याची जाणीवही कमीच असलेल्या काळात पं. विषणूु दिगंबर पलुस्कर यांनी संगीतशिक्षण ही अन्य विद्यापीठीय शिक्षणासारखीच अभ्यास करण्याची, परीक्षा घेता येईल अशी गोष्ट आहे, असा शास्त्रीय विचार केला आणि तडीस नेला.
गांधर्व महाविद्यालयाची स्थापना
एक काळ असा होता की एकूणच शिक्षणाच्या बाबतीत आजच्या इतक्या सोयी, सुविधा-सवलती मुळीच नव्हत्या. संगीताच्या बाबतीत तर यापेक्षाही फार वाईट परिस्थिती होती. त्या काळात कलाकार मोठे; पण समजा एखाद्याला विचारले की, 'आपके गाने में वो सरगम क्या होता है?' तर साधी माहिती मिळणेही मुश्किल होते. उलट 'बहोत मुश्किल है, सिर्फ एक जनम में नहीं आती, और हमारे शागीर्द बनने बगैर कुछ नहीं मिलेगा, कुछ नहीं समझेगा' असलीच काहीतरी उर्मट उत्तरे मिळण्याचा तो काळ होता. अशा त्या काळात दक्षिण महाराष्ट्रातल्या मिरज या संस्थानी गावातल्या एका २९ वर्षे वयाच्या पंडित विष्णू दिगंबर पलुसकर नावाच्या एका तरुणाने भारताच्या अखंड पंजाबातल्या लाहोर नावाच्या शहरात, ५ मे १९०१ रोजी 'गांधर्व महाविद्यालय' या नावाची एक संस्था स्थापन केली. ज्या काळात कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी या शब्दांची देशी भाषांमध्ये भाषांतरेही झाली नव्हती त्या काळात [[पं. पलुसकरांनी संस्थेच्या नावातच 'महाविद्यालय' हा शब्द स्वतंत्रपणे योजला आहे.
पुढे पंडितजींच्या शिष्य-प्र-शिष्यांनी आणि देशात ठिकठिकाणी गांधर्व महाविद्यालयाच्या शाखा स्थापन केल्या.
संगीत विद्यापीठ
पं विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या निधनानंतर लगेचच त्यांच्या शिष्यांनी याच संगीतप्रचार प्रसार कार्यासाठी गांधर्व महाविद्यालय मंडळ स्थापन केले. त्याचेच आजचे रूप म्हणजे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ. २०१२ सालच्या डिसेंबरात 'गांधर्व महाविद्यालय मंडळा'च्या स्थापनेला एक्क्याऐंशी वर्षे पूर्ण झाली, आणि या संस्थेचे एका विद्यापीठामध्येरूपांतर झाले.