Jump to content

"दयाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दयाळ (Oriental Magpie-Robin) या पक्ष्याचा म्युझिकापिडी (Musicapidae) या पक्षिकुलात आणि...
(काही फरक नाही)

२०:४५, २५ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

दयाळ (Oriental Magpie-Robin) या पक्ष्याचा म्युझिकापिडी (Musicapidae) या पक्षिकुलात आणि टर्डिडी या उपकुलात समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव कॉप्सिकस सॉलॅरिस (Copsychus saularis) असे आहे. kopsukhos या ग्रीक शब्दाचा अर्थ कृष्णपक्षी आणि सोलॅरिस या लॅटिन शब्दाचा अर्थ सूर्याशी संबंधित.

दयाळ पक्षाची महाराष्ट्रात वापरली जाणारी मराठी पुल्लिंगी नावे :- उसळी/हजोर उसळी (गोडी भाषेत); काबरो (भिल्लांच्या भाषेत); कालाचिडी; कालो करालो (पारध्यांच्या भाषेत); काळचिडी (नाशिक); खापर्‍या चोर; डोमिगा; दयाळ (पुणे), दहीगोल (चंद्रपूर), दहेंडी; पद‍उसीर (माडिया भाषेत), बडा चिविंच (कोरकू भाषेत); मडवळ (सिंधुदुर्ग), सुई (भंडारा),

स्त्रीलिंगी नावे :- मोठी काळ टेटी (ठाणे); गवळण, गुमदडी (गोवा), सुईन (चंद्रपूर).

नपुंसकलिंगी नावे :- बांडा पाखरू

अन्य भाषांतील नावे :- काली सुई चिडिया, ग्वालिन, दयाल, दहंगल, दहिंगल, दहियर, दहियल, दोयल, महरी (सर्व हिंदी); अश्वक,अश्वकश्रीवद्‌, अश्वाख्य, करेटु, कालकंठ कलविंग, दध्यंक, दाधिक, नीलकंठ, भारत दध्यंक, श्रीवद्‌ पक्षी (सर्व संस्कृत); दैयड (गुजराथी); पेद्द नलंचि, सरल गाडु (दोन्ही तेलुगू); उब्बेकुळ्ळ सुव्वि, मडिवाळ सुव्वि, मडिवाळ हक्कि (सर्व कानडी); गुंडू करिच्चान्‌, राबिन्‌ (दोन्ही तामीळ).

राजस्थानचा रखरखीत प्रदेश सोडून भारतात दयाळ सगळीकडे आढळतो. डोंगराळ भागात १,२२० मीटर उंचीपर्यंत तो सापडतो. झाडीत राहणारा असल्यामुळे तो झाडांच्या राईत आणि बागांत असतो. गावात आणि खेड्यापाड्यांत तो नेहमी दिसतो.

दयाळ आकाराने बुलबुल पक्ष्याएवढा असतो. नर काळा-पांढरा असतो, तर मादी नरासारखीच पण काळ्या रंगाऐवजी गर्द राखी रंगाची असते. दोघेही नेहमी शेपटी हलविताना दिसतात.

दयाळ हा गाणारा पक्षी आहे. मधुर आणि लांबलचक शीळ घातल्यासारखे याचे गाणे असते. सकाळी व तिसर्‍या प्रहरी एखाद्या झाडावर उंच ठिकाणी बसून हा गात असतो व मधूनमधून शेपटी उभारीत असतो. इतर पक्ष्यांच्या आवाजाचीही हा नक्कल करतो.