"कॉम्रेड शरद पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: कॉम्रेड शरद पाटील हे मुळात कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट) या पक्ष... |
(काही फरक नाही)
|
१६:१९, २० डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
कॉम्रेड शरद पाटील हे मुळात कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट) या पक्षाचे धुळे जिल्ह्याचे संघटक होते. ब्राह्मणेतर चळवळीशी संबद्ध असलेल्या घराण्याची पार्श्वभूमी लाभलेल्या शरद् पाटलांना त्या चळवळीची व्याप्ती जातीय समतेपुरतीच असल्याचे वाटल्याने पाटील समतेसाठी व्यापक वर्गलढा उभारणार्या कम्युनिस्ट पक्षाकडे आकृष्ट झाले. पण तेथे वर्गविषमतेवर अधिक भर दिला जाऊन जातीय विषमतेकडे दुर्लक्ष होते, असा अनुभव आल्यावर ते साम्यवादी चळवळीत जातिअंताची भाषा बोलू लागले. पण मार्क्सवादी विज्ञानाच्या चौकटीत जातीच्या भाषेला थारा नाही, हे लक्षात आल्याने मार्क्सवाद्यांवर वर्गाधळेपणाचा आरोप करीत ते वेगळे विश्लेषण करू लागले आणि परिणामत: त्यांची पक्षातूनच हकालपट्टी झाली, आणि शरद पाटलांनी, इ.स. १९७८साली.सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष या नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. या पक्षाची धोरणे कार्ल मार्क्स, बाबासाहेब आंबेडकर आणि जोतिबा फुले यांच्या विचारसणीवर आधारित आहेत. (निदान) २००९ सालापर्यंत शरद पाटील या पक्षाचे अध्यक्ष होते.