"गोविंदराव कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: गोविंदराव कुलकर्णी (जन्म : कोल्हापूर, इ.स. १९२९; मृत्यू : कोल्हापूर,... |
(काही फरक नाही)
|
००:१७, १३ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
गोविंदराव कुलकर्णी (जन्म : कोल्हापूर, इ.स. १९२९; मृत्यू : कोल्हापूर, ११ डिसेंबर २०१४) हे एक मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांच्या पत्नीचे नाव विजया. डॉ. चारुहास भागवत व इंजिनीअर उमेश भागवत ही त्यांची मुले.
गोविंद कुलकर्णी यांचे मूळ नाव शरदचंद्र लक्ष्मण भागवत. लहानपणापासूनच त्यांना सिनेमाविषयी ओढ होती. कुटुंबीयांचा सिनेमात काम करण्यास विरोध असल्याने आणि वडिलांनी सिनेमासाठी मूळ नाव लावायचे नाही, अशी ताकीद दिल्याने त्यांनी गोविंद कुलकर्णी हे नाव घेतले. त्याच नावाने दिग्दर्शक, निर्माता म्हणून नाव कमवले.
कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेले दादा कोंडके यांचे सिनेमे विशेष गाजले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत वीस सिनेमांचे दिग्दर्शन व सहा सिनेमांचे निर्माते-दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.
गोविंदराव कुलकर्णी यांचे चित्रपट
- अंगार (निर्मिती)
- अशी रंगली रात्र (दिग्दर्शन, निर्मिती)
- एकटा जीव सदाशिव (१९७२, दिग्दर्शन, निर्मिती)
- गोविंदा आला रे आला (दिग्दर्शन)
- चुडा तुझा सावित्रीचा (निर्मिती)
- जय तुळजा भवानी (निर्मिती)
- झाकली मूठ सवा लाखाची (निर्मिती)
- दैवत (निर्मिती)
- पिंजरा (१९७२, अभिनय)
- बन्या बापू (निर्मिती)
- मर्दानी (१९८३, दिग्दर्शन, निर्मिती)
- मानाचं कुंकू (१९८१, दिग्दर्शन, निर्मिती)
- मुरळी मल्हारी रायाची (निर्मिती)
- लागेबांध (निर्मिती)
- शपथ तुला बाळाची (निर्मिती)
- सोंगाड्या (१९७०, दिग्दर्शन, निर्मिती)
- हर्या नार्या झिंदाबाद (दिग्दर्शन, निर्मिती)
.