Jump to content

"आशा शेलार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: होणार सून मी या घरची या दूरचित्रवाणीवरील मालिकेत जान्हवीच्या...
(काही फरक नाही)

१४:५८, २ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

होणार सून मी या घरची या दूरचित्रवाणीवरील मालिकेत जान्हवीच्या सावत्र आईचे काम करणार्‍या अभिनेत्री आशा शेलार या त्यांच्या श्रेष्ठ अभिनयामुळे प्रेक्षकांच्या डोळ्यात भरतात. दारिद्‌र्‍याचे चटके खात आयुष्य गेलेल्या स्त्रीचे दुःख काय असते ते त्यांच्‍या जिवंत अभिनयामुळे प्रेक्षकांना जाणवत राहते.

आजच्या पिढीला किंवा प्रेक्षकांना आशा शेलार जरी नव्या वाटत असल्या तरी अभिनयाच्या क्षेत्रातल्या या फार जुन्या मातब्बर खेळाडू आहेत. ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या हव्यासापासून दूर राहून केवळ अभिनयाची भक्ती करणार्‍या मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक असे त्यांच्याबाबत म्हणता येईल.