Jump to content

"नेत्रा साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नेत्रा सदाशिव साठे (जन्म : इ.स. १९३७; मृत्यू : कल्याण, २३ ऑगस्ट २०१४) य...
(काही फरक नाही)

१९:२९, २८ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

नेत्रा सदाशिव साठे (जन्म : इ.स. १९३७; मृत्यू : कल्याण, २३ ऑगस्ट २०१४) या एक मराठी चित्रकार आणि शिल्पकार होत्या.

नेत्रा साठे यांचे वडील कृष्णराव केतकर हे स्मारक-शिल्पे बनवीत. शिल्पाकृतींची सरकारी कामे मिळविण्यासाठी त्यांना दिल्लीत राहणे गरजेचे होते. त्यांचा स्टुडिओ कल्याणमध्ये व फाउंडरी डोंबिवलीत होती.

नेत्राच्या आईने कन्येला संगीत, नृत्य, नाट्य, काव्य, साहित्य या सगळ्यांचीच गोडी लावली. लग्नाअगोदर मुंबईत असताना नेत्रा संस्कृत नाटकांतून अभिनय करीत असत. अभिज्ञान शाकुंतल आणि मृच्छकटिकम्‌ या नाटकांतून त्यांनी दाजी भाटवडेकर यांच्या दिग्दर्शनाखाली अनुक्रमे प्रियंवदा व मदनिकेच्या भूमिका केल्या होत्या.


(अपूर्ण)